बाथरूममध्ये सापडल्या ४० मुली! बेकायदेशीर मदरशाचे छांगूर बाबाशी कनेक्शन

लखनऊ : लखनऊजवळील बहराईच जिल्ह्यातील पयागपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी एका अनधिकृत मदरशावर टाकलेल्या छाप्यात बाथरूममध्ये ४० अल्पवयीन मुली सापडल्या. या मुली ९ ते १४ वयोगटातील आहेत.


ही कारवाई पयागपूरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) अश्विनी पांडे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून संशय व्यक्त केला जात होता की, पहेलवाडा परिसरातील या मदरशात काहीतरी संशयास्पद सुरू आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, पोलिस आणि महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने छापा टाकण्यात आला.


छाप्यादरम्यान मदरशाचा संचालक खलील अहमद याने पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांना आत प्रवेश मिळाला. इमारतीची तपासणी केली असता, तिसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये ४० मुली बंदिस्त अवस्थेत आढळल्या. सर्व मुली घाबरलेल्या होत्या.


महिला पोलिसांच्या मदतीने सर्व मुलींना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुली खरोखर त्या मदरशात शिक्षणासाठी होत्या का, याचा तपास सुरु आहे.


मदरशाच्या संचालकाविरोधात तपास सुरू असतानाच तो घटनास्थळावरून फरार झाला. त्याची मुलगी फातिमा हिने मात्र आरोप फेटाळून लावत सांगितले की, तेथे कोणताही मदरसा नव्हता, फक्त कोचिंग सेंटर चालवले जात होते. तसेच सर्व मुलींना त्यांच्या पालकांनी घरी घेऊन गेले असल्याचा दावा तिने केला.


या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी खलील अहमदच्या संपत्तीतील अचानक झालेल्या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काही वर्षांपूर्वी छोटंसं दुकान चालवणारा खलील आता तीन मजली इमारत व २४ दुकानांचा मालक कसा झाला? याचा छडा लावण्याची मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.


ही घटना अलीकडील उत्रौलातील छंगूर बाबा प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून तपास करण्याची मागणी केली जात आहे.


एसडीएम पांडे यांनी याप्रकरणी एक सविस्तर अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला असून, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी मोहम्मद खालिद यांनी यावर पुढील प्रक्रिया सुरू असल्याची पुष्टी केली. तसेच जिल्ह्यात सध्या ४९५ अनधिकृत मदरसे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे