Stock Market Update: सकाळच्या सत्रात दबावामुळे 'सेल ऑफ' सुरूच मात्र आयटी शेअर्समध्ये रिकव्हरी ? सेन्सेक्स व निफ्टीत किरकोळ घसरण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. गिफ्ट निफ्टीतील संथ सुरुवातीने हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणेच सेन्सेक्स ४८.५५ अंकाने व निफ्टी २.५० अंकाने घसरला आहे. कालपर्यंत रिअल्टी व आयटी शेअर्समध्ये झा लेल्या 'सेल ऑफ' फटका आजही बसण्याची शक्यता आहे.तरीही आज आयटी ०.१८% समभागात किरकोळ वाढ झाल्याने आज बाजारात रिकव्हरी होईल का हा कळीचा मुद्दा आहे. तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी धडाक्याने सुरु ठेवलेले विक्रीचे सत्र जीएसटी कपातीच्या बाजारातील फायद्यावर भारी पडेल का अशी शंका गुंतवणूकदारांना आहे. सकाळच्या सत्रात दोन्ही बँक निर्देशांकात मात्र आज वाढीचे संकेत सकाळच्या सत्रात तरी मिळत आहे ज्या कारणामुळे बाजाराला सपोर्ट लेवल तरी राखण्यास मदत होईल. मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज संमिश्र प्रतिसाद अपेक्षित आहे. तसेच भूराजकीय कारणासह घरगुती कारणांमुळे गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय विशेष निर्देशांकात आपला प्रतिसाद नक्की नोंदवू शकतात.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला असून मात्र अनेक निर्देशांकात आज वाढ पहायला मिळत आहे.सकाळी सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (०.४४%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.५४%), एफएमसीजी (०.४५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो (०.३९%) निर्देशांकात झाली आहे.खासकरून अस्थिरता निर्देशांक ०.७३% उसळल्याने दोन टक्क्यांची पातळी पार करेल या अस्थिरतेवर बाजारातील शेवटच्या सत्राचे भविष्य अवलंबून असेल. जागतिक गुंतवणूक दार उद्याच्या युएस बाजारातील पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) आकडेवारीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्यासह आजच्या नवीन जागतिक घडामोडीवर बाजाराचे लक्ष लागले आहे.काल यु एस बाजारासह आशियाई बाजारात संमिश्र कौल कायम होता. सुरूवातीच्या सत्रात ही आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसादच मिळाला आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ क्रिसील (६.९३%), लुपीन (४.२२%), अदानी पॉवर (३.३९%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.३७%), ईरीस लाईफसायन्स (३.२६%), आलोक इंडस्ट्रीज (१.९४%), आदित्य बिर्ला फॅशन (१.८२%), क्लीन सायन्स (१.७९%), ग्लेन मार्क फा र्मा (१.५१%), कोहान्स लाईफ (१.३३%), झेन टेक्नॉलॉजी (१.१०%), वेदांता (०.८८%), वोडाफोन आयडिया (०.८१%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (०.८०%) समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (४.०७%), अँस्ट्रल (२.२२%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (१.९७%), टाटा मोटर्स (१.९०%), तानला प्लॅटफॉर्म (१.८३%), वर्लपूल (१.७०%), सिग्नेचर ग्लोबल (१.५३%), एलटी फूडस (१.४९%), गोडिजि ट जनरल (१.४५%), आर आर केबल्स (१.४२%), वन ९७ (१.३१%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.११%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (१.१३%), एमआरएफ (०.९७%), आयसीआयसीआय लोंबार्ड (०.९५%), मुथुट फायनान्स (०.९१%), अशोक लेलँड (०.८९%), एशियन पेटं स (०.७९%) समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, गिफ्ट निफ्टी निफ्टी ५० मध्ये ४५ अंकांची किरकोळ घसरण दर्शवित आहे. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत, जरी सतत अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत.निफ्टी निर्देशांक २५ ००० पातळीच्या वर राहण्यात यशस्वी झाला परंतु सलग चौथ्या सत्रात नकारात्मक बंद झाला, जो सतत विक्रीचा दबाव आणि सावध बाजारातील भावना दर्शवितो. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार २५१०० पातळीवर ठेवला गेला आहे, त्यानंतर २५२५०... डाउन साइडवर, समर्थन २५००० आणि २४९०० पातळीवर आहे, तर २४८०० पातळीच्या खाली ब्रेकडाउन आणखी घसरणीचा दबाव निर्माण करू शकते.बँक निफ्टीने देखील कमकुवतपणा दर्शविला, ५५५०० पातळीच्या खाली बंद झाला परंतु ५५००० पातळीच्यावर रा हण्यात यशस्वी झाला. जर खरेदीचा वेग वाढला आणि निर्देशांक निर्णायकपणे ५५२०० ओलांडला, तर तो ५५४०० पातळीच्या दिशेने मार्ग उघडू शकतो आणि ५५५०० पातळीवर.नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार ५५००० पातळीवर दिसून येत आहे आणि या पातळीपेक्षा कमी राहिल्यास नवीन विक्रीचा दबाव येऊ शकतो, ज्याचे संभाव्य लक्ष्य ५४९०० आणि ५४८०० पातळी आहे.


प्रवाहाच्या आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २४ सप्टेंबर रोजी सलग तिसऱ्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका वाढवली, २४२५ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) विक्रीचा दबा व सहन करत राहून त्याच दिवशी १२११ कोटी किमतीच्या इक्विटीज खरेदी केल्या.वाढत्या अस्थिरतेची आणि मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांना सावधगिरीने "बाय-ऑन-डिप्स" धोरण राखण्याचा सल्ला दिला जातो. जोखीम व्यवस्थापित करण्यासा ठी रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि मागचे स्टॉप-लॉस घट्ट ठेवणे शिफारसित आहे. निफ्टी २५२५० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक ट्रेंड सावधपणे तेजीत असताना, सध्याचे बाजार वातावरण पाह ता प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक घडामोडींचा बारकाईने मागोवा घेणे हे नेव्हिगेट करण्यासाठी महत्त्वाचे असेल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'तात्काळ काही ट्रिगर्स नसल्यामुळे बाजार हळूहळू खाली येत आहे. ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, ज्यामुळे उद्योगाच्या संभाव्य उत्पन्न वाढीला काही प्रमाणात फटका बसत आहे. या वर्षभर बाजारातील लक्षणीय घट ही एफआयआयची सतत विक्री होती. भारतात विक्री करण्याच्या आणि इतर बाजारपेठांमध्ये खरेदी करण्याच्या एफआयआ य धोरणामुळे भरपूर लाभांश मिळाला आहे, जो इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठेच्या प्रचंड कमी कामगिरीवरून दिसून येतो. निफ्टी वार्षिक ३.६% ने घसरला आहे तर हँग सेंग ३८.६% ने आणि कोस्पी ३३.७३% ने वाढला आहे. या प्रचंड कमी काम गिरीमुळे आणि भारतातील उच्च मूल्यांकनामुळे एफआयआयना भारतात विक्री सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.कमी व्याजदराच्या व्यवस्थेसह भारतात राबविल्या जाणाऱ्या सुधारणांमध्ये आर्थिक वाढ आणि कॉर्पोरेट कमाई वाढीला चालना देण्याची क्षमता आहे. यामुळे एफआयआय भारतीय बाजारात परत येतील. परंतु हे शाश्वत आधारावर कधी होईल हे आम्हाला माहित नाही. गुंतवणूकदारांसाठी उच्च दर्जाचे स्टॉक जमा करणे सुरू ठेवण्याची ही योग्य वेळ आहे. संयम हाच महत्त्वाचा घटक आहे.'


आजच्या सकाळच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'जरी २५००० मध्ये पुन्हा एकदा घट झाली असली तरी, त्यातील चढउतार २५२७८/३३० क्षेत्राच्या पलीकडे जा ण्यासाठी पुरेशी गती मिळवू शकले नाहीत, ज्याला आम्ही संभाव्य वाढीचा सूचक म्हणून विचारात घेतले होते. या दिशेने, २४८८०-८०० चा मार्ग अजूनही कायम आहे.'

Comments
Add Comment

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वक्तव्य

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संभाजी भिडे

२०२५ च्या पहिल्या ९ महिन्यांत जीसीसी संचालित ऑफिस स्पेसची मागणी ५० एमएसएफ पेक्षा जास्त, वार्षिक ८% वाढ: कॉलियर्स

तिमाही जागेचा वापर १७.२ एमएसएफवर स्थिर राहिला आहे; टॉप सात शहरांमध्ये तुलनेने समान प्रमाणात पसरलेला  बेंगळुरू

Borivali : बोरिवलीत रस्ता खचला! पोलीस घटनास्थळी, वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा सल्ला

मुंबई : मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका प्रमुख जंक्शनवर आज सकाळी मोठी घटना घडली. सुमन नगर पुलाखालील कल्पना

मुंबईच्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाची अशी केली स्वच्छता

मुंबई : धार्मिक विधींमुळे मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य

Agni-Prime Missile : भारताची ऐतिहासिक झेप!: 'अग्नी-प्राईम'ची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, २००० किमीच्या पल्ल्याने शत्रू हादरणार

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षेत्रात आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. अंतरमध्य पल्ल्याच्या

दीर्घकालीन निवृत्तीवाढीला चालना देण्यासाठी अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफकडून High Growth Pension Fund लाँच

नवी दिल्ली:अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड (Axis Max Life Company) ज्याला पूर्वी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड