भारतात स्त्री-पुरुष वेतनात अजूनही मोठी दरी: Naukri सर्वेक्षण

करिअर ब्रेक व लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतन तफावत


मुंबई: भारतात स्त्री-पुरुषांच्या वेतनात अजूनही लक्षणीय तफावत कायम असल्याचे ‘नोकरी’(Naukri) या देशातील आघाडीच्या रोजगार मंचाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ८० हून अधिक उद्योगांतील आणि ८ प्रमुख शहरांतील २०००० पेक्षा जास्त नो करी शोधणाऱ्यांवर आधारित या सर्वेक्षणात, प्रत्येक दोनपैकी जवळपास एका व्यावसायिकाला (४५%) वाटते की स्त्रियांना पुरुषांपेक्षा २०% पेक्षा अधिक वेतनतफावत सहन करावी लागते.सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, मुलांच्या जन्मानंतर स्त्रियांना घ्यावा लाग णारा करिअर ब्रेक तसेच कार्यस्थळी जाणवणारा लिंगभेद हे या तफावतीमागील मुख्य घटक ठरत आहेत. विशेष म्हणजे, आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात ही तफावत सर्वाधिक प्रमाणात दिसून आली आहे.भारतातील स्त्री-पुरुष वेतन तफावतीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे प्रसूतीनंतर महिलांनी घेतलेला करिअर ब्रेक असल्याचे नोकरीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणात अर्ध्याहून अधिक व्यावसायिकांनी (५१%) करिअर ब्रेकला प्रमुख घटक म्हटले आहे, तर २७% व्यावसायिकांनी कार्यस्थळी होणाऱ्या भेद भावाकडे निर्देश केला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात पुरुष आणि महिला दोघांच्याही प्रतिक्रिया सारख्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा कल आयटी (५६%), औषधनिर्मिती (५५%) आणि ऑटोमोबाइल (५३%) या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक दिसून येतो. तसेच, ५ -१० वर्षे (५४%) आणि १०-१५ वर्षे (५३%) अनुभव असलेल्या व्यावसायिकांमध्ये करिअर ब्रेकचा परिणाम अधिक ठळकपणे जाणवतो, कारण या कालावधीत प्रसूतीसाठी मोठ्या विश्रांतीची गरज भासते.


नोकरी’च्या सर्वेक्षणानुसार, अर्ध्या व्यावसायिकांनी (५०%) स्त्री-पुरुष वेतनात सर्वाधिक तफावत असलेले क्षेत्र म्हणून आयटीकडे निर्देश केला आहे. त्यानंतर रिअल इस्टेट (२१%), एफएमसीजी (१८%) आणि बँकिंग (१२%) ही क्षेत्रे क्रमाने आली असली, तरी ती आ यटीच्या तुलनेत खूपच मागे असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, हा समज तरुण व्यावसायिकांमध्ये अधिक ठळक आहे. सर्वेक्षणानुसार, ५३% फ्रेशर्स (१-२ वर्षे अनुभव) आणि ५५% मध्यम-स्तरीय व्यावसायिक (२-५ वर्षे अनुभव) यांनी आयटी क्षेत्राला सर्वाधिक वेतन तफावत ठेवणारे क्षेत्र म्हटले आहे. भौगोलिक दृष्ट्या पाहता, हैदराबाद (५९%) आणि बंगळूर (५८%), ही देशाची तंत्रज्ञान केंद्रे, आयटी क्षेत्रातील स्त्री-पुरुष वेतनातील असमानतेबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त करणारी शहरे ठरली आहेत.‘नोकरी’च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे की वरिष्ठ व्यावसायिक स्त्री-पुरुषांच्या वेतन तफावतीकडे तुलनेने अधिक गांभीर्याने पाहतात. १०-१५ वर्षांचा अनुभव असलेल्या ४६% व्यावसायिकांनी आणि १५+ वर्षांचा अनुभव असलेल्या ४७% व्यावसायिकांनी ही तफावत २०% पेक्षा जास्त अस ल्याचे मत व्यक्त केले आहे.


उद्योगांच्या पातळीवर पाहता, विमान वाहतूक (५७%), शिक्षण (५२%) आणि आयटी (५०%) या क्षेत्रांमध्ये वेतन असमानतेची जाणीव सर्वाधिक ठळक आहे. याउलट,तेल व वायू तसेच रिटेलसारख्या पारंपरिक उद्योगांमध्ये तुलनेने सकारात्मक दृष्टिकोन दिसून आ ला. तेल व वायू क्षेत्रातील प्रत्येक चारपैकी एकाहून अधिक प्रतिसादकाच्या मते ही तफावत ०-५% इतकी नगण्य आहे.‘नोकरी’च्या सर्वेक्षणात, स्त्री-पुरुष वेतन तफावत कमी करण्यासाठी व्यावसायिकांनी सुचवलेल्या उपायांमध्ये कामगिरी-आधारित पदोन्नतीला स र्वाधिक पसंती (३४%) मिळाली आहे. विशेष म्हणजे, १५+ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांपैकी ३९% जणांनी हाच उपाय सर्वात परिणामकारक असल्याचे मत व्यक्त केले. याशिवाय भेदभावरहित आणि पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया (२७%) तसेच पारदर्श क वेतन पद्धती (२१%) हे पर्यायही मोठ्या प्रमाणावर सुचवले गेले. विशेषतः नोयडा आणि गुरुग्रामसारख्या प्रमुख कॉर्पोरेट केंद्रांमध्ये, वेतनातील पारदर्शकतेची मागणी सर्वाधिक प्रबळ असल्याचे दिसून आले.


नोकरीच्या सर्वेक्षणातील निष्कर्षातून हे स्पष्ट होते की, स्त्री-पुरुष वेतन तफावत अस्तित्वात असल्याचे सर्व उद्योग व कारकिर्दीच्या पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर मान्य करण्यात आले आहे. मात्र या तफावतीची कारणे आणि त्यावरील उपाययोजना प्रदेश, क्षेत्र आणि लिंग यानुसार वेगवेगळी असल्याचे आढळले. करिअर ब्रेक आणि कार्यस्थळी होणारा भेदभाव ही आव्हाने कायम असली, तरी कामगिरी-आधारित पदोन्नती, पारदर्शक नियुक्ती व वेतन पद्धती, तसेच कार्यस्थळी साहाय्यक ठरणारी धोरणे यांसारखे प्रणालीगत हस्त क्षेप भारतात अधिक न्याय्य आणि समानतेवर आधारित कामकाजाचे भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असे सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,