याला म्हणतात जिगरबाज! ७६ वर्षांचा गुराखी वाघाशी भिडला आणि जिंकला!

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीट परिसरात ७६ वर्षांच्या गुराख्याने वाघाच्या हल्ल्याला तोंड देत स्वतःचा जीव वाचवला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. या थरारक झुंजीत गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सकाळी नेहमीप्रमाणे खांदला गावातील गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेलेले शिवराम गोसाई बामनकर (वय ७६) यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. परंतु, शिवराम यांनी घाबरून न जाता, मोठ्या हिंमतीने या हल्ल्याचा सामना केला. या दोघांमध्ये काही काळ झुंज सुरू होती. अखेरीस, शिवराम यांचा प्रतिकार जोरदार असल्याने वाघाला माघार घ्यावी लागली आणि तो जंगलात पळून गेला.


या हल्ल्यात शिवराम बामनकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात ते कसेबसे गावात पोहोचले आणि त्यांनी ही थरारक घटना कुटुंबीयांना व गावकर्‍यांना सांगितली. त्यानंतर, त्यांना तात्काळ राजाराम येथील आरोग्य पथकात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


दरम्यान, ७६ वर्षांच्या या गुराख्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराम यांच्या मुलीने, वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर यांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानींची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली पाच तास चौकशी!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली

पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे,

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता