'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन करा' - मंत्री नितेश राणे

'मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'


मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून महिना अखेरपर्यंत हे महामंडळ स्थापन करावे अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मंत्रालयात आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील मोठा निधी हा पायाभूत सुविधा उभारणीवर खर्च होत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावीत आणि त्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करावा. तसेच जे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झालेले नाहीत त्यांचे नियोजन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २ मध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी. निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक लाभार्थी योजनांवर भर द्यावा. बाब निहाय खर्चाचे नियोजन करावे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.


मंत्री राणे म्हणाले की, मच्छिमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. मच्छिमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी या महामंडळांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याला प्राधान्य देण्यात यावे. या महिना अखेरीस ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित