Asia cupमध्ये पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम

अबुधाबी : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १३३ धावा केल्या आणि पाकिस्तानने १२ चेंडू शिल्लक असताना हे आव्हान सहज पार केले.


श्रीलंकेच्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी ४५ धावांची सलामी भागिदारी केली. पण महिश थीकशनाने दोन्ही सलामीवीरांना सलग बाद करून श्रीलंकेला पुन्हा सामन्यात आणले. सॅम अयुब आणि सलमान आगा यांनाही लागोपाठ बाद करण्यात आले.


पाकिस्तानने १२ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. या कठीण परिस्थितीत मोहम्मद हरिसने १३ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी ३२ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि महेश थीकशनाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिस एकही धाव न काढता बाद झाला.त्यानंतर पथुम निस्सांका ८ धावा काढून बाद झाला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने ५० धावांची झुंजार खेळी केली. कर्णधार चरिथ असलंकाने २० धावा, चमिका करुणारत्नेने १७ धावा आणि कुसल पेरेला आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हरिस रौफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अबरार अहमदनेही एक विकेट घेतली.


या विजयामुळे पाकिस्तानची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता जिवंत आहे. दरम्यान, सुपर ४ टप्प्यात श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. क्रिकेट चाहते आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत, जी फक्त तेव्हाच शक्य होणार आहे. जेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी होईल.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली