आज रूपया एक महिन्याच्या निचांकी पातळीवर मोठ्या प्रमाणात रूपया घसरला 'या' कारणांमुळे

प्रतिनिधी:युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर युएस अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. तसेच पुन्हा एकदा डॉलर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व एकूणच युएस प्रशासनाने एच१बी वन व्हिसा भरमसाठ प्रमा णात वाढल्याने त्याचा एकत्रित परिणाम भारतीय रुपयाच्या मूल्यांकनावर झाला आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रातच रूपयांची पातळी एक महिन्याच्या सर्वात निचांकी पातळीवर (All time Low) वर पोहोचली आहे. सकाळी रूपया ८८.४६ रूपये प्रति युएस डॉ लर पातळीवर गेला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात (Forex) मध्ये रुपया ८८.४१ वर व्यवहार करण्यास सुरुवात केली परंतु आणखी घसरून तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८.५३ या इंट्राडे नीचांकी पातळीवरही पोहोचला आहे जो त्याच्या मागील बंद पेक्षाही २५ पैशांनी घसरला होता.


यापूर्वीच अमेरिकेकडून भारताची आर्थिक कोंडी सुरु आहे. अमेरिकेने भारताकडून आयाती वस्तूंवर अतिरिक्त ५०% टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली होती. आता एच१बी व्हिसावर १ लाख डॉलर आकारण्यास सुरूवात केल्याने विशेषतः हेवी वेट आयटी कंप न्या आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यांनी भारताची आर्थिक कोंडी केल्याने आता कर्मचाऱ्यांची युएस बाजारातील उपस्थिती कमी होणार असल्याने रूपयांची आवकही कमी होणार आहे. ज्याचा थेट परिणाम विदेशी चलनाच्या तुटीवर होणार असून रूपयांचे आ णखी अवमूल्यन (Devaluation) होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजही रूपयांवर इतर विदेशी चलनाच्या बास्केट मधील तुलनेत दबाव पातळी निर्माण झाली.


आतापर्यंत चलनीय परिपेक्षात विचार केल्यास या वर्षात आतापर्यंत इतर आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी कमी झाली आहे. डॉलर निर्देशांकात अलीकडच्या घसरणीचा फायदा त्यांना या नव्या घडामोडीमुळे गमवावा लागला आहे. भारतीय निर्याती वरील अमेरिकेच्या तीव्र शुल्कामुळे व्यापाराच्या शक्यतांना धक्का बसला आहे आणि परकीय भांडवलाचा प्रवाह कमी झाला आहे, ज्यामुळे चलनावर दबाव आला आहे. केवळ आर्थिक वर्ष २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली होती.तज्ञांच्या मते,भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रुपया अवमूल्यनचा वेग मंदावण्याची परवानगी आहे .आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये चलनवाढ ४-४.५% च्या मर्यादेत राहण्याचा अंदाज असल्याने, थोडीशी कमकुवतता आटोक्या त आणता येईल.

Comments
Add Comment

Delhi bomb blast case: दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश, २० हून अधिक अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये

अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस