आयसीसी ग्लोबल बिझनेस समिट 2025 चा समारोप
मुंबई: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) ने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'वन नेशन, मल्टीपल अपॉर्चुनिटीज' या थीमसह ग्लोबल बिजनेस समिट 2025 चे यशस्वीरित्या आयोजन केलं. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत २० हून अधिक देशांमधील पॉलिसीमेकर्स, राजनयिक, कॉर्पोरेट लीडर्स, उद्योजक आणि उद्योग भागधारकांसह १५०० हून अधिक प्रतिनिधींचा प्रभावी सहभाग होता. अनेक हाय-ग्रोथ क्षेत्रांमधील चर्चा आणि एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून, या कार्यक्रमाने ग्लोबल ट्रेड,इं वेस्टेमेंट आणि इनोवेशनचे केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेला पुन्हा पुष्टी दिली.
उद्घाटनाच्या दिवशी माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, ज्यांनी पायाभूत सुविधांवर आधारित विकासाचा वापर करून 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्यासो बत महाराष्ट्र विधानसभेचे माननीय सभापती राहुल नार्वेकर, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे आणि कंबोडियाचे वाणिज्य उपमंत्री महामहिम पेन सोविचेटची ही उपस्थिति होती. या पार्श्वभूमीवर, आयसीसीचे अध्यक्ष आणि जिंदल स्टेनलेसचे मैनेजिंग डायरेक्टर अभ्युदय जिंदल यांनी डायलॉग, इनोवेशन आणि समावेशक विकासाला चालना देण्यात या शिखर परिषदेची भूमिका अधोरेखित केली.दुसऱ्या दिवशी शिखर परिषदेतील सर्वात महत्त्वाच्या निकालांपैकी एक म्हणजे आयसीसी आणि इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल (आयबीपीसी), कुवेत यांच्यात पाच वर्षांच्या वैधतेसह आणि स्वयंचलित नूतनीकरणाच्या तरतुदीसह व्यापार प्रोत्साहन, गुंतवणूक सुविधा, तंत्रज्ञान हस्तांतरण, सल्लागार आणि संयुक्त व्यवसाय कार्यक्रमांमध्ये वाढत्या द्विप क्षीय सहकार्याचा पाया रचण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
कार्यक्रमात बोलताना आयसीसीचे अध्यक्ष आणि जिंदल स्टेनलेसचे मैनेजिंग डायरेक्टर अभ्युदय जिंदल यांनी ग्लोबल समिटबद्दल बोलताना सांगितले की, 'आयसीसी ग्लोबल बिझनेस समिट मध्ये गेल्या दोन दिवसांत अर्थपूर्ण चर्चा आणि विचारविनिम य करण्यात आले. आमच्यासमोर असलेल्या संधींवर भर देण्याबरोबरच, या कार्यक्रमाने आम्हाला वाढ आणि नवोपक्रमाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी कृतीशील अंतर्दृष्टी देखील दिली. मला आशा आहे की सामायिक केलेले विचार आणि टेकवे बिजनेस आणि अर्थव्यवस्थांसाठी अर्थपूर्ण परिणामांमध्ये रूपांतरित होतील.'
आपल्या समारोपीय भाषणात, आयसीसीचे डायरेक्टर जनरल डॉ. राजीव सिंग म्हणाले, 'या वर्षीच्या जागतिक व्यापार शिखर परिषदेच्या जबरदस्त यशाचे साक्षीदार होताना आम्हाला आनंद होत आहे, जिथे वीसहून अधिक देशांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण, भागीदारी निर्माण केली आणि वेगाने बदलणाऱ्या जगासाठी उपायांची सह-निर्मिती केली. गेल्या दोन दिवसांत जागतिक संवादासाठी भारताची भूमिका एक सूत्रधार म्हणून पुन्हा अधोरेखित झाली आहे आणि या ग्लोबल समिटने आकांक्षा कृतीशी जुळ वून घेण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने, मी आमच्या भागीदारांचे, उद्योग नेत्यांचे आणि माध्यमांचे त्यांच्या दृढ पाठिंब्याबद्दल आणि भारत सरकारच्या दृष्टिकोन आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार मानतो. येथील संभाषणे आत्मनिर्भर भारताच्या भावनेशी आ णि व्हिजन इंडिया@2047 च्या रोडमॅपशी खोलवर जुळतात, एक असा भारत जो स्वावलंबी, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि समावेशक आणि शाश्वत विकासाचे मॉडेल आहे. आयसीसी या सामायिक महत्त्वाकांक्षांना कायमस्वरूपी परिणामात रूपांतरित करण्यासाठी भारत आणि जागतिक समुदायासोबत चालण्यासाठी वचनबद्ध आहे.'
लीगल आणि राउंडटेबल परिषदेत भारताचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार श्री. रंजन गोगोई आणि भारताचे अॅटर्नी जनरल आर.वेंकटरमणी यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत वरिष्ठ जागतिक कायदेतज्ज्ञांनी अनुपालन (Compliance) सीमापार जोखीम (Overseas Risk) आणि भू-राजकीय आव्हानांवर चर्चा केली. राजस्थान, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांनी राज्यस्तरीय सत्रे आयोजित केली होती, ज्यात प्रत्येक सत्रात क्षेत्र-विशिष्ट गुंतवणूक संधींचे प्रदर्शन करण्यात आले, तर भारत, सायप्रस आणि त्यापलीकडे असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या तंत्रज्ञान संवादात एआय, सायबरसुरक्षा आणि शाश्वत नवोपक्रमातील सहकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.