नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ३० तारखेला कोणतेही उद्घाटन होणार नाही.


या विमानतळाच्या नामकरणावरून गेले अनेक महिने राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक आगरी-कोळी समाज, तसेच प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला त्यांच्या नेत्यांचे, दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनही करण्यात आले. विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाईक रॅली काढून जनभावना व्यक्त केल्या होत्या.


राजकीय बैठकांमध्येही या नामकरणावरून वाद रंगले. खासदार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष खासदार कपिल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. बाळ्या मामांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आंदोलन केल्याशिवाय दि.बा. पाटील यांचे नाव लागू शकणार नाही." तर, कपिल पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची संमती दिली आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला "दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असेच नाव दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या उद्घाटनाच्या आणि नामकरणाच्या या गोंधळात नेमकी तारीख आणि नाव काय राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रौत्सवात झेंडूचे दर वाढले, उत्पादन घटल्याने किंमतीवर परिणाम

रायगड : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असून, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात

महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला धनगर आरक्षणासाठी उपोषणस्थळी जात असताना घडली घटना जालना

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प हे ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू - परिवहन मंत्री

मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए