उपवासाला भगर खाताय तर आधी हे जरूर वाचा...

नांदेड : उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. पावसाळयातील वातावरण बूरशीच्या वाढीसाठी अनूकुल असते, अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले आहे.
Comments
Add Comment

नवरात्रौत्सव २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपवास अनुभव आणि दिनक्रम

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात भक्त देवीची भक्तिभावाने ९ दिवस पूजा करतात. या काळात व्रत

रिकाम्यापोटी लवंग चघळून खाण्याचे अद्भुत फायदे !

सकाळी रिकाम्यापोटी लवंग चघळून खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लवंग, ज्याचा वापर स्वयंपाक घरात विविध मसाले,

Health: अंजीर खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: अंजीर (Dry Fig) हे एक आरोग्यदायी सुकामेवा असून, त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अंजीर खाण्याचे मुख्य फायदे

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे