इन्स्टाग्रामवर ५० व्ह्यूज द्या अन् एक ग्रॅम सोनं मोफत मिळवा

एक ग्रॅम मोफत सोन्याची जाहिरात अंगलट; साताऱ्यात वाहतूक कोंडीमुळे ज्वेलर्सवर गुन्हा दाखल


सातारा: सोशल मीडियावर केलेल्या एका जाहिरातीमुळे साताऱ्यातील एका ज्वेलर्स दुकानदाराला मोठा फटका बसला आहे. एका ग्रॅम मोफत ज्वेलरीच्या ऑफरमुळे महिलांची दुकानासमोर प्रचंड गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने साताऱ्यातील दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



काय होती ती ऑफर?


साताऱ्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका ज्वेलर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर एक अनोखी जाहिरात केली होती. 'इन्स्टाग्रामवर दुकानाच्या पेजला फॉलो करा, जाहिरातीची इमेज तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करा आणि ५० व्ह्यूज मिळाल्यास एका ग्रॅमची मोफत फार्मिंग ज्वेलरी मिळवा,' अशी ऑफर पहिल्या १००० महिलांसाठी देण्यात आली होती.



या ऑफरची माहिती शहरात पसरताच दुकानासमोर महिलांची मोठी गर्दी झाली. दुकानासमोर गर्दी झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना पोलिसांना न दिल्याने सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.



दुकान मालकावर गुन्हा दाखल


या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण केल्याच्या आरोपावरून दुकान मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणत्याही महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


सध्या सोशल मीडियावर केलेल्या या जाहिरातीची आणि त्यानंतर झालेल्या कारवाईची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.

Comments
Add Comment

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार

निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड मुंबई : राज्यातील

आता दुर्गम भागांतही इंटरनेट सेवा पोहोचेल

मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात स्टारलिंक कंपनीशी माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य

शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, अतुल देशमुखसह अनेक जण शिवसेनेत दाखल

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर होताच

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर?

भिगवण : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. तशी चर्चा भोर तालुक्यात जोर धरत

शिंदेंच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने झिडकारली

संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यात 'सिटिंग-गेटिंग'वरून जुंपली! बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या