Prahaar Stock Market: आयटी घसरणीचे 'सेल ऑफ' अस्थिरता निर्देशांक ५.५९% वर उसळला ! शेअर बाजारात पहिल्याच दिवशी घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण कायम राहिली आहे. आयटी शेअर गडगडल्याने आज बाजारात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. प्रामुख्याने आज शेअर बाजाराला बँक निर्देशांकासह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही घस रण कायम राहिल्याने आज बाजाराला धोकादायक पातळी पार करता आली नाही. सकाळच्या सत्रातील ५.०८% पासून अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा किंबहुना ५.५९% पातळीवर कायम राहिल्याने गुंतवणूकदारांनी अस्थिरतेच्या स्थितीत 'सेल ऑफ' केले असल्याचे स्पष्ट होत आहे. अखेरीस सेन्सेक्स ४६६.२६ व निफ्टी १२४.७० अंकांने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स पातळी ८२१५९.९७ पातळीवर व निफ्टी २५२०२.३५ पातळीवर स्थिरावला आहे.आज व्हाईट हाऊसने एच१बी व्हिसावर आकारलेले नवे दर पाहता आयटी क्षेत्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठा दबाव निर्माण झाला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाल्यामुळे आयटी शेअर दिवसभरात कोसळले होते. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर युएस बाजारही टेक्निकली वर च्या बाजूला झुकत आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलातही चीनने आपला व्याजदरात स्थिर ठेवल्याने तेजीचा प्रतिसाद मिळाला होता. मात्र गिफ्ट निफ्टीसह भारतीय शेअर बाजाराची स्थिती समाधानकारक राहिली नाही. अखेरीस आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला आहे.


आज हेवीवेट आयटी शेअर्समध्ये घसरण झाली असताना इतरही अनेक ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही घसरण झाली होती. एनएसई निफ्टी निर्देशांकात (NSE Nifty IT Index) सर्वात वाईट कामगिरी करणारा ठरला आहे टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस हे निफ्टी ५० निर्देशांकातील सर्वाधिक घसरलेले शेअर आहेत.आयटीसह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण मिडकॅप सिलेक्ट (१.१०%), आयटी (२.९५%), फार्मा (१.४१%), हेल्थकेअर (१.०७%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (२.४७%) समभागात झाले आ हे.अखेरच्या सत्रात शेअर बाजारात सर्वाधिक वाढ अदानी पॉवर (१९.९८%), अदानी टोटल गॅस (१९.८५%), अदानी ग्रीन (११.७८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (७.८१%), अदानी एनर्जी सोलूशन (६.८७%), अनंत राज (५.८१%), एडब्लूएएल अँग्री बिझनेस (५.५१%), ए मएमटीसी (५.३०%), हिंदुस्थान कॉपर (४.८५%), वेदांत फॅशन (४.६३%), मुथुट फायनान्स (३.८३%), इन्फोऐज इंडिया (३.०२%), झी एंटरटेनमेंट (२.९७%), मन्नपुरम फायनान्स (२.५८%), गार्डन रीच (२.४२%), एमआरएफ (२.१०%), सीपीसीएल (१.८३%), पी टीसी इंडस्ट्रीज (१.८०%),वन ९७ (१.६१%), इटर्नल (१.५७%), आदित्य बिर्ला फॅशन (१.४९%), अदानी पोर्ट (१.१५%) समभागात झाले आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण झेंसर टेक्नॉलॉजी (५.३३%), केफीन टेक्नॉलॉजी (४.८७%), एमफसीस (४.७२%), एलईटी माईंड ट्री (४.५३%), कोफोर्ज (४.३७%), साई लाईफ (४.३१%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (३.५३%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (३.५३%), ए लटी फूडस (३.४१%), ग्लेनमार्क फार्मा (३.८२%), पुनावाला फायनान्स (३.१६%), टेक महिंद्रा (३.११%), व्होल्टाज (३.०८%), टीसीएस (३.०१%), महानगर गॅस (२.८५%), ब्रेनबीज सोलूशन (२.८१%), सिटी युनियन बँक (२.६९%), इन्फोसिस (२.६७%), डाबर इं डिया (२.५०%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय बाजारांमध्ये आज अस्थिर व्यापार सत्र दिसून आले, ज्यामध्ये नफा आणि तोटा दोन्हीही घसरत होते. जागतिक स्तरावर नकारात्मक सं केत आणि नवीन अर्जदारांसाठी $१००,००० च्या H-१B व्हिसा शुल्काच्या चिंतेमुळे दिवसाची सुरुवात कमकुवत झाली. जागतिक बाजारपेठेतील सावध वातावरणाचे प्रतिबिंब बेंचमार्क निर्देशांकांनी खालच्या पातळीवर उघडले. कमकुवत सुरुवात असूनही, बाजारा ने ही उणीव भरून काढली आणि पुनर्प्राप्तीचा प्रयत्न केला.तथापि, विक्रीचा दबाव पुन्हा निर्माण झाला, ज्यामुळे सत्राच्या उत्तरार्धात नफा-बुकिंगचे वर्चस्व राहिले आणि निफ्टी त्याच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. क्षेत्रीय आघाडीवर, आयटी समभागांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला, त्यानंतर फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग काउंटर होते, जे सर्व लाल रंगात बंद झाले. दुसरीकडे, ऊर्जा, मीडिया, धातू आणि उपभोग या क्षेत्रातील मजबूत शेअर्स उदयास आले, जे एकूण कमकुवतपणा असूनही सकारात्म क ते सौम्य सकारात्मक राहिले.'


आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,गेल्या दोन दिवसांपासून निफ्टीमध्ये घसरण दिसून येत आहे, जी त्यापूर्वीच्या १००० अंकांच्या तेजीचा विचार करता अगदी सामान्य आहे. खरं तर, अशा किरकोळ सुधारणा सतत वाढीच्या ट्रेंडसाठी आरोग्यदायी आहेत. अल्पावधीत, समर्थन २५०५० पातळीवर ठेवले आहे आणि जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर राहतो तोपर्यंत एकूण रचना अबाधित राहते. २५०५० पातळी च्या खाली एक निर्णायक ब्रेक सुधारणा २४८०० पातळीपर्यंत वाढवू शकतो. वरच्या बाजूला, २५२५० पातळीवर प्रतिकार दिसून येतो. या पातळीच्या वरची हालचाल अपट्रेंड पुन्हा सुरू होण्याचे संकेत देऊ शकते.'


त्यामुळे आज बाजारात अस्थिरता मोठ्या प्रमाणात असली तरी गुंतवणूकदारांची आशा मावळली नाही. युएस भारत यांच्यातील नवी घडामोड बाजाराला नवा आकार देईल हे निश्चित आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेसारख्या दिग्गज कंपन्यांनीही निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवली आहे. तथापि जागतिक बाजारपेठेत सावधगिरीचा वातावरण राहिले असल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर झाला.

Comments
Add Comment

आयटी क्षेत्रातील धक्कादायक बातमी! पुन्हा एकदा आयटीत मरगळ येणार अमेझॉन करणार मोठी कर्मचारी कपात

प्रतिनिधी:आयटी क्षेत्रातील धक्कादायक बाब समोर आली आहे. एका जागतिक अहवालानुसार, अमेझॉन या जागतिक दर्जाच्या

Naxal Leader Bhupati : ६ कोटींचे बक्षीस असलेला 'मास्टरमाईंड' अखेर शरण! नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता भूपती नेमका कोण?

गडचिरोली : माओवाद विरोधी (Anti-Naxal) लढ्यात आज गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा विजय

LG Electronics: ठरलं ! आयपीओ सुपरहिट झाल्यानंतर भारतासाठी एलजीची नवी घोषणा !

प्रतिनिधी: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओला न भूतो ना भविष्यती असा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता एलजी इलेक्ट्रॉनिक्स

सोशल मीडियातील चूक 'येवले अमृततुल्य'ला भोवणार ?

मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी

Linkedin News Update: लिंक्डइनच्या २०२५ च्या टॉप स्टार्टअप्स क्रमवारी यादीत यादीत ए आय फिनटेक, क्विक कॉमर्स कंपन्यांचा बोलबाला

लिंक्डइनच्या २०२५ च्या टॉप स्टार्टअप्स यादीतून असे दिसून येते की एआय, फिनटेक आणि क्विक कॉमर्स हे भारतातील मुख्य

Stocks Recommendation: दिवाळीतील जबरदस्त कमाईसाठी 'हे' शेअर खरेदी करा रेलिगेअर ब्रोकिंगकडून नवी शिफारस

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मजबूत फंडामेंटलमुळे व मजबूत आर्थिक उपस्थितीआधारे रेलिगेअर ब्रोकिंग रिसर्चने ५