आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांचा उपवास करतात आणि त्याच्या कठोर व्रताचे पालन करतात. त्यांच्या उपवासाच्या अनुभवावरून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या या काळातील दिनक्रमाबाबत सविस्तर जाणून घेऊया .
पंतप्रधान मोदींचा नवरात्र उपवासाचा अनुभव
पंतप्रधान मोदी म्हणतात की उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नाही, तर एक प्रकारची शरीरशुद्धी आणि शिस्त आहे. उपवास करताना ते स्वतःला एकटं ठेवतात आणि त्यातून एक वेगळीच शांती आणि ऊर्जा प्राप्त करतात. त्यांच्या मते उपवास हे एक सायन्स आहे, ज्याचा अनुभव त्यांनी बालपणी घेतला.
उपवास करण्यापूर्वीची तयारी
शरीर स्वच्छ करणे: उपवास सुरू करण्यापूर्वी ते योग आणि आयुर्वेदाच्या मदतीने ५ ते ७ दिवस शरीरातील टॉक्सिन्स काढतात.
पाण्याचे सेवन: उपवासाच्या दिवसांपूर्वी भरपूर पाणी प्यायचे, ज्यामुळे शरीर विषमुक्त होते आणि शरीराला उपवासासाठी तयार करता येते.
उपवासाचा दिनक्रम
पंतप्रधान मोदी उपवासाच्या काळातही नियमित कामकाज करतात. त्यांच्या मते, उपवासामुळे ऊर्जा कमी होत नाही तर वाढते.
उपवास करताना ते एकांतात राहतात.
उपवासाच्या काळात विचार करण्याची प्रक्रिया वेगळी आणि ताजी होते, ज्यामुळे नवीन कल्पना आणि ऊर्जा मिळते.
उपवासाचे फायदे
शरीर आणि मनाची शुध्दी होते.
पचनशक्ती सुधारते.
मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते.
ऊर्जा आणि शक्तीची जाणीव होते.
पंतप्रधान मोदींचा उपवासाचा प्रेरणादायक अनुभव
लहानपणी महात्मा गांधींच्या गायींच्या रक्षणासाठी एक दिवसाचा उपवास त्यांनी अनुभवला. तेव्हा भूक लागल्याचा त्यांना पहिल्यांदा वेगळा अनुभव आला आणि त्यांनी उपवासाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला हळूहळू उपवासासाठी तयार केले.
पंतप्रधान मोदींचा उपवास अनुभव हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर तो आत्मशिस्त आणि आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. नवरात्रीच्या पवित्र काळात उपवास करताना त्यांच्या दिनक्रमाचे आणि अनुभवाचे अनुसरण करून आपणही शरीर व मनाला नवे ताजेपणा देऊ शकतो.