कोकणात ढगफुटी केव्हा कोणत्या भागात होईल याचा अंदाज बांधणेही शेतकऱ्याला अवघड झाले आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. कोकणातील खाडीकिनारी गावातून खाजणात केली जाणारी भातशेती पाण्याखालीच आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. राज्यातील अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले आहे. ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था कोकणासह राज्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. माध्यमांवर दाखवली जाणारी छायाचित्रे, व्हीडिओ केवळ शेतकऱ्यालाच नाही, तर पाहणाऱ्या कुणाचेही मन हेलावणारे असतात; परंतु यात कोकणातील नुकसानीचे चित्र कधी माध्यमांवर दिसत नाहीत. भातशेती, फळबागायतीच नुकसान झालेलं असलं तरीही आलेल्या परिस्थितीला, प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी कोकणातील शेतकऱ्यांची असते.
संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसधारा बरसत आहेत. पाऊस थांबता थांबेना अशी स्थिती यावर्षी कोकणात आहे. उत्साहाने साजरा करणाऱ्या गणेशोत्सवातही मुसळधार पाऊस पडत होता. कोकणवासीय कोणताही उत्सव साजरा करताना कधीच खिशात पैसे नाहीत किंवा आणखी काही होतय म्हणून कधीच डोक्याला हात लावून बसत नाहीत, अरे काय हा त्या ‘देवाक काळजी’ हा परवलीचा शब्द कोकणवासीयाच्या संवादात सहज सापडतो. त्यामुळे बाहेर पाऊस पडत असतानाही गणपतीचा उत्सव पूर्वीच्याच दिमाखात, उत्साहात कोकणवासीयांनी साजरा केला.
गणेशोत्सवानंतर पाऊस थांबेल या अपेक्षेत कोकणातील शेतकरी होता; परंतु तसं काही घडलं नाही. पाऊस नुसता हजेरी लावत नाही, तर तो दिवसभर कोसळत असतो. ढगफुटी केव्हा कोणत्या भागात होईल याचा अंदाज बांधणेही शेतकऱ्याला अवघड झाले आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. कोकणातील खाडीकिनारी गावातून खाजणात केली जाणारी भातशेती पाण्याखाली गेली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली.
राज्यातील अनेक भागांतील शेतीचे नुकसान झाले आहे. ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था कोकणासह राज्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. माध्यमांवर दाखवली जाणारी छायाचित्रे, व्हीडिओ केवळ शेतकऱ्यालाच नाही, तर पाहणाऱ्या कुणाचही मन हेलावणारे असतात; परंतु यात कोकणातील नुकसानीचे चित्र कधी माध्यमांवर दिसत नाही. कोकणातील शेतकरी कधीही भातशेती, फळबागायतीच नुकसान झालेलं असलं तरीही आलेल्या परिस्थितीला, प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी कोकणातील शेतकऱ्यांची असते. कर्जबाजारीपणा कोकणातील शेतकऱ्यालाही चुकलेला नाही; परंतु कोकणातील शेतकरी आपणाला कर्जाचे किती पैसे भरता येईल तितकच कर्ज घेणारा आणि बँकाचे कर्ज वेळच्या-वेळी परतफेड करण्याची मानसिकता असलेला कोकणातील सर्वसामान्य शेतकरी आहे. यामुळेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे काय ? याची वाट न पाहता काम करत राहणारा शेतकरी आहे. पूर्वी कोकणातील शेतकरी कष्टाळू नाही आळशी आहे. असं उर्वरित महाराष्ट्रातील राजकीय नेते भाषण द्यायचे; परंतु कोकणातील शेतकरी कष्टाळूही आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणातील शेतकरी ‘समाधानी’ वृत्तीचा आहे.
कदाचित यामुळे त्याच नुकसानही होत असलं तरीही मृगजळाच्या इथला शेतकरी पाठलाग करत बसत नाही. नियोजनरीत्या फळबागायत किंवा शेती केली जाते. अलीकडे अनेक तरुण गावात शेती, फळबागायती करताना दिसतात. मात्र, निसर्गाच्या बेभरवशामुळे कोकणातील शेतकरी नाराज आहे. एकीकडे निसर्गाचा बेभरवसा, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा शेतात वाढत चाललेला मुक्तसंचार यात वन्य प्राण्यांचा गावो-गावी जो मुक्तसंचार वाढला आहे तो केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. भातशेती खरे तर यावर्षी चांगलं पीक येईल असे अंदाज कोकणातील शेतकरी आखून होता. कोकणात भातशेतीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यातून आजही भातशेती केली जात आहे; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती करण्याचे प्रमाण कमी आहे. अर्थात त्याची अनेक कारणे आहेत. शेतीत राबण्यासाठी मजूर मिळत नाही. कुटुंबात गावात राहणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
या सगळ्याचा परिणाम कोकणातील भातशेती करण्यावर झालेला आहे. यावर्षी कोकणातील अनेक शेतकरी सांगतात महिन्याभरापूर्वी भातशेती चांगली झालेली; परंतु गेल्या पंधरवड्यात जो पाऊस पडतोय त्यामुळे भातशेतीच काय होणार हे कोणाला काहीच सांगता येणारे नाही. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जो पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शेतकरी मागणी करत असले तरीही शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून मिळणारं अनुदान, मदतही तुटपुंजीच राहते. कोकणातही महाराष्ट्राला इतर भागाप्रमाणेच भातशेती बागायतीचे नुकसान झाले आहे. फक्त कोकणातील शेतकरी, बागायतदार रडताना कधीच टीव्ही चॅनेलवर दिसत नाही. ही बाब तितकीच
महत्त्वाची आहे. ज्यांना बांबू लागवडीचं महत्त्व समजले त्यांनी प्रयत्नही चालविले आहेत. काही शेतकऱ्यांनी बांबू लागवड करणे किती किफायतशीर आहे हे देखील दाखवून दिले आहे. बांबूची एकदा लागवड केली की वारंवार त्यात लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. जशी उसाची लागवड तशीच बांबू लागवड आहे. इतर पिकांच्या बाबतीत जशी मेहनत घ्यावी लागते तशी मेहनत बांबू लागवडीमध्ये नाही. इतर पिकांना हवामानाचा फटका बसतो; परंतु बांबूला हवामानाचा फटका बसत नाही. त्यामुळे बांबू लागवडीकडे कोकणातील शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यसरकारनेही राज्यात बांबूमिशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी क्रांती घडवणारा बांबू उद्योग हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. आजवर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेताच्या बांधावर वडिलोपार्जित बांबू लागवड झालेली आहे. बांबू लागवडीच्याबाबतीत पूर्वी फार कोणी लक्ष घातले नव्हते; परंतु गेल्या काही वर्षांत बांबू लागवड आणि बांबू उद्योगावर फार चर्चाही होऊ लागली आहे. आजही शेतकऱ्यांना बांबू लागवडीत फार स्वारस्य नाही; परंतु त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे वन्यप्राण्यांपासून होणारा उपद्रव बांबू लागवडीला आणि बांबूला आलेल्या व्यावसायिक महत्त्व आजही फार लोकांना माहीत झालेलं नाही. त्यामुळे पडीक डोंगराळ माळरान असतानाही बांबू लागवडीचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
- संतोष वायंगणकर