प्रतिनिधी: रामदेव बाबांकडून दिवाळीचे अँडव्हान्स गिफ्ट ग्राहकांना मिळणार आहे. जीएसटी दर कपातीमुळे आता एफएमसीजी उत्पादनांवर, ग्राहकांच्या गरजेच्या वस्तूंवर दरकपातीचा सर्वाधिक फायदा होणार असल्याने जीएसटी तर्कसंगतीकरण (GST Ra tionalisation) चा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडीची कंपनी पतांजली फूडस लिमिटेड (Patanjali Foods Limited) कडून आपल्या कमाल किरकोळ किंमत (Maximum Retail Price MRP) मध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.अन्न तसे च इतर कंपनीच्या उत्पादनावर ही दरकपात लागू असले असे कंपनीने म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेतील सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.ही सुधारणा २२ सप्टेंबरपासून ला गू होणार आहे.
सध्याची चार-दर प्रणाली (Four Rate Structure) आता ५% आणि १८% अशा सुव्यवस्थित दोन-स्तरीय प्रणालीने (Slabs) बदलली जाईल.तर लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी वेगळा ४०% स्लॅब कायम ठेवण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवि वारी २२ सप्टेंबरपासून पुढील पिढीतील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली, ज्याला त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दिशेने एक मोठे पाऊल यावेळी म्हटले होते.
पतांजली कंपनीने दिलेल्या नवीन माहितीनुसार, न्यूट्रेला सोया रेंजमधील १ किलो पाकीटाचा दर, मिनी पॅक (Mini Chunk),ग्रॅन्युलस म्हणजेच सोयाबीनचे छोटे कणिका अथवा बारिक कण हे २१० रूपयांवरून १९० रूपयांवर आले आहेत. तसेच २०० ग्रॅम उत्पाद न ५० रूपयांवरून ४७ रूपयांवर करण्यात आले आहे. कंपनीच्या बिस्किट पुड्यातही दर कपात लागू झाली असून कंपनीची बिस्किटे व कूकीज (३५ ग्रॅम) ४.५० रूपयाला, मारी बिस्कीट (२२५ ग्रॅम) ३० रूपयांवरून कमी करत २७ रूपयांना मिळणार आहेत. प तांजली नुडल्स (Patanjali Twisty Tasty Noodles) ५० ग्रॅम हा १० रूपयांवर कमी होत आता ९.३५ रूपयांना मिळणार आहे. कंपनीची टूथपेस्ट दंतकांती (Dant Kanti Natural २०० ग्रॅम) आता १२० रूपयांवरून घसरण १०६ रूपयांना मिळणार आहे.
आपल्या हेल्थ व वेलनेस सेगमेंटमध्येही दरकपात कंपनीने केली आहे. आवळा, गुलवेल (Giloy) ६ ते १० रूपयांनी स्वस्त झाला आहे. तर गाईचे तूप (९०० ML) ७८० रूपयांवरून घसरत ७३१ रूपयांनी मिळणार आहे. बॉडी क्लिनझर (७५ ग्रॅम) २५ रूपयांवरून घसरत २२ रूपयांना मिळणार आहे.याविषयी आपल्या अधिकृत निवेदनात कंपनीने म्हटले आहे की,'हे पाऊल भारतीय ग्राहकांना परवडणारी, उच्च दर्जाची आणि नैसर्गिक उत्पादने पुरवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला बळकटी देते, तसेच सरकारच्या सुलभ पोषण आणि आरोग्यसेवेच्या ध्येयालाही पाठिंबा देते.'