'ऋषभ पंत'च्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढणार ?

मुंबई : टीम इंडियामध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो तीन ते चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला.


ऋषभ पंतला दहा सामने खेळता येणार नाही. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेतील आठ सामन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने आहेत. पंत अद्याप १००% तंदुरुस्त नाही आणि परिणामी, त्याची वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाही.


भारत २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पांढऱ्या चेंडूची मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी संपेल. दोन्ही मालिकांसाठी पंतची उपलब्धता अनिश्चित असल्याचे माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या पायाची सूज अद्याप कमी झालेली नाही. त्याला त्याचे वॉकिंग बूट काढण्यासाठीही काही वेळ हवा आहे.


कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू


वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील १० सामने आता पंतला मुकावे लागणार असल्याने, तो कधी पुनरागमन करणार हे सांगता येत नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. कसोटी सामन्यांनंतर, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल, तर पाच टी-२० सामन्यांची मालिका ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत