PM Modi : "सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन"; टॅरिफ वाद, H-१B बदलांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ठाम भूमिका, मोदी म्हणाले...

गुजरात : गुजरातच्या भावनगरमध्ये आज (२० सप्टेंबर) 'समुद्र से समृद्धी' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांसाठी तब्बल ३४,२०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्च होणार असून, यामुळे देशाच्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्राला मोठा हातभार लागणार आहे. मोदी यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाची पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "भारताचा सर्वात मोठा शत्रू कुठलाही देश नाही, तर परदेशांवरील आपले परावलंबन आहे. हे परावलंबन संपवून आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे."


प्रधानमंत्र्यांच्या या वक्तव्याने 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' यांसारख्या उपक्रमांना नव्या गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प राबवल्यामुळे गुजरातसह संपूर्ण देशात उद्योग, व्यापार आणि वाहतूक क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. यामुळे लाखो रोजगार संधी निर्माण होतील, तसेच समुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशांचा विकास वेगाने होईल.



गुजरातसाठी २६,३५४ कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन


गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २६,३५४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे राज्याच्या औद्योगिक, ऊर्जा, आरोग्य आणि वाहतूक क्षेत्रात नवा टप्पा सुरू होणार आहे. उद्घाटन करण्यात आलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये छारा बंदरावर एचपीएलएनजी री-गॅसिफिकेशन टर्मिनल यांचा समावेश आहे, ज्यामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहे. याशिवाय, गुजरात आयओसीएल रिफायनरीमध्ये ॲक्रिलिक्स अँड ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प सुरू होणार असून रसायन उद्योगाला मोठी चालना मिळेल. ऊर्जा क्षेत्रातही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये ६०० मेगावॉटचा ग्रीन शू इनिशिएटिव्ह, पीएम-कुसुम योजनेअंतर्गत ४७५ मेगावॉट सोलर फीडर, तसेच ४५ मेगावॉटचा बादेली सोलर प्रकल्प यांचा समावेश आहे. यामुळे अक्षय ऊर्जा उत्पादनात गुजरात अग्रगण्य ठरणार आहे. विशेष म्हणजे, कच्छमधील धोर्डो हे गाव संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पहिले गाव होणार आहे. आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे. भावनगर आणि जामनगर येथील सरकारी रुग्णालयांचा विस्तार होणार असून, त्यामुळे हजारो रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील. वाहतूक क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ७० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चार-पदरीकरण करण्यात येणार असून, यामुळे उद्योग-व्यापारासोबतच स्थानिक प्रवास आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेले हे प्रकल्प गुजरातसह देशाच्या सर्वांगीण विकासात टप्पा ठरणार आहेत.



पंतप्रधान मोदी काय म्हणाले?


मोदी म्हणाले, “आज भारत विश्वबंधुत्वाच्या भावनेने जगासमोर वाटचाल करत आहे. आपल्या विकासाला थांबवणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे दुसऱ्यांवर असलेले आपले अवलंबित्व. हेच आपले खरे कमकुवतपण आहे आणि त्यावर मात करणे गरजेचे आहे.” पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, १४० कोटी देशवासियांचे भविष्य ‘आत्मनिर्भर भारतात’च सुरक्षित आहे. जर आपण परावलंबनावर टिकून राहिलो, तर देशाचा स्वाभिमान आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मोदी पुढे म्हणाले की, “आत्मनिर्भर भारत केवळ आर्थिक धोरण नाही, तर तो देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा खरा आधार आहे. स्वावलंबनातूनच भारत जगातील सर्वांत मोठी ताकद म्हणून उभा राहील.” भावनगरच्या सभेत मोदींचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या