झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड


जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झिरो बॅलेन्स खात्यांमधूनही पैसे निघू लागल्याची माहिती आसपासच्या परिसरात पसरली. याचा फायदा घेण्यासाठी अनेकजणांनी रातोरात पोहोचून एटीएमबाहेर रांगा लावल्या. झिरो बॅलेन्स अकाऊंट असलेल्या अनेकांनी एटीएममधून पैसे काढले. याची माहिती मिळताच पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे.


बँक खात्यात पैसे नसले तरीही एसबीआयच्या एटीएममधून रोख काढता येत असल्याचा मेसेज १७ सप्टेंबरच्या रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. बँकेंच्या अनेक ग्राहकांना एसएमएसवरून ही माहिती मिळाली. यानंतर अलवर आणि आसपासच्या परिसरातील एसबीआयच्या अनेक एटीएमबाहेर गर्दी जमली. बँक प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवताच त्यांनी अनेक एटीएम बंद केले. काही एटीएमच्या जवळ पोलिसांना काही संशयास्पद तरुण दिसले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्रभरात जवळपास ५० तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सगळ्यांचे मोबाइल आणि वाहने जप्त केली आहेत.


प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या संकेतस्थळावर काहीतरी तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याचा फायदा उचलला. पोलिसांनी किमान २० एटीएम बंद केले. पोलीस रात्रभर एटीएमच्या आसपास तैनात होते. या सगळ्या प्रकरणावर एसबीआयचे अधिकारी मौन बाळगून आहेत. एसबीआयकडून या सगळ्या घडामोडींबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. बँक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तांत्रिक समस्येचा फायदा उचलण्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने