हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी हिंदी कवी कुमार अंबुज यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी (ता. २४) सायंकाळी सहाला गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.


२०१० पासून सुरू झालेला हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत दर वर्षी एका निवडक अमराठी कवीला दिला जातो. या पुरस्कारात रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्राचा समावेश आहे. यापूर्वी कवी चंद्रकांत देवताले (हिंदी), के. सच्चिदानंदन (मल्याळम), सीतांशू यशश्चंद्र (गुजराती), सुरजीत पातर (पंजाबी), टेमसुला आओ (इंग्रजी), विष्णू खरे (हिंदी), एच. एस. शिवप्रकाश (कन्नड), अमिताभ गुप्ता (बंगाली), नीलिमकुमार (आसामी) या दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


यंदाच्या पुरस्कारासाठी निवड समितीने एकमताने कुमार अंबुज यांच्या नावाची शिफारस केली. या समितीत कवी व अनुवादक प्रा. चंद्रकांत पाटील, डॉ. गोरख थोरात, डॉ. राजशेखर शिंदे यांचा समावेश होता, तर समितीचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पहिले. मध्य प्रदेशातील गुना येथील कवी कुमार अंबुज हे नव्वदनंतरच्या पिढीतील दमदार कवी, कथालेखक व समीक्षक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची ओळख प्रामुख्याने कवी म्हणून अधिक ठळक आहे. त्यांच्या पाच काव्यसंग्रहांसह कवितांचे एक संकलन व संपादन प्रकाशित झाले आहे. यापूर्वी त्यांना मध्य प्रदेश साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर