दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करत सांगितले की, तिच्या पतीचा मित्र अनीस सिद्दीकीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा गैरवापर करून तिचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ तयार केले. त्यांचा आधार घेत ब्लॅकमेल केले आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेमध्ये आरोपीसोबत त्याची आई आणि बहीणही सहभागी असल्याचा दावा पीडितेने केला आहे. ३० वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासोबत लाहोरी गेट परिसरात राहते. तिचा पती सुकामेव्याचा व्यवसाय करतो.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनीसने तिच्यासोबत काढलेला फोटो घेतला आणि त्याचा वापर करून आक्षेपार्ह एआय फोटो आणि व्हीडिओ तयार केले. यावर्षी जून महिन्यात, जेव्हा तिचा पती घरी नव्हता, तेव्हा अनीसने पीडितेला हे फोटो दाखवून धमकी दिली की ते व्हायरल करून तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करेन. त्याने घटस्फोटाचा धाक दाखवला आणि तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.


सततच्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी तिने आरोपीला पाच लाख रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. मात्र इतक्यावरही अनीस थांबला नाही. सप्टेंबर महिन्यात त्याने पुन्हा तिचे एआय बनवलेले व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.


पीडितेच्या पतीला तिचे आक्षेपार्ह फोटो मिळाल्यानंतर त्याने चौकशी केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या पतीच्या मदतीने तिने धैर्य गोळा करून पोलिसांत एफआयआर दाखल केला. सध्या या प्रकरणाचा तपास एसआय अवंती राणी यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. अद्याप आरोपी व त्याच्या कुटुंबातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Bihar elections: पंतप्रधान घेणार १० जाहीर सभा तर अमित शहा २५ सभा घेणार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत.

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या

'या' ८ राज्यांमध्ये मतदानाच्या दिवशी 'सवेतन' सुट्टी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांसाठी घोषणा; पगार कपात करणाऱ्या मालकांवर कारवाई होणार नवी दिल्ली: भारतीय निवडणूक