Friday, September 19, 2025

दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार! महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर बांधला जात आहे एक अनोखा ओव्हरब्रिज

दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार! महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर बांधला जात आहे एक अनोखा ओव्हरब्रिज

महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर शहरातील पहिला केबल-स्टेड पूल

मुंबई: दक्षिण मुंबईतील स्थानिकांसाठी तसेच कामानिमित प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ज्यामुळे दक्षिण मुंबईत होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास देखील मदत होणार आहे. त्यासाठी महालक्ष्मी येथे एक अनोखा ओव्हरब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर बांधण्यात येणारा मुंबईतील हा पहिला केबल-स्टेड ब्रिज असेल.

हा ब्रिज केशवराव खाडे मार्ग आणि सात रस्ता-महालक्ष्मी मैदान यांना जोडेल. यामुळे महालक्ष्मीमधील वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल. हा ब्रिज १० मीटर लांब आहे. हा नवीन केबल-स्टेड ब्रिज १०० वर्षे जुन्या महालक्ष्मी ब्रिजची जागा घेईल.

ब्रिजचे काम कधी पूर्ण होतील

फेब्रुवारी २०२० पासून या ब्रिजच्या बांधकाम सुरू आहे, या संपूर्ण प्रकल्पाची अंतिम मुदत ऑक्टोबर २०२६ ही निश्चित करण्यात आली होती, परंतु कामाला विलंब झाला. बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलीकडेच पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. ओव्हरब्रिजला आधार देण्यासाठी ७० मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, पुलांशी संबंधित आणि पूरक ६६ कामांचे प्रस्तावित काम ३० नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शतकानुशतके जुन्या पुलावरून ताशी अंदाजे ५,००० वाहने प्रवास करतात. या ठिकाणी संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. ती या ओव्हरब्रिजच्या माध्यमातून सुटेल अशी अपेक्षा आहे.

७४५ कोटींचा प्रकल्प

हा पूल अंदाजे ८०३ मीटर लांब आणि १७.२ मीटर रुंद आहे. रेल्वे हद्दीतील त्याची लांबी २३.०१ मीटर असेल. दुसरा पूल महालक्ष्मी स्टेशनच्या उत्तरेकडील डॉ. ई. मोसेस रोडला वल्ली मार्गे धोबीघाट रोडशी जोडेल आणि त्याची लांबी ६३९ मीटर असेल. दोन्ही पूल प्रत्येकी चार लेनचे असतील आणि या प्रकल्पाची एकूण किंमत ७४५ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment