आजचा दिवस 'अदानींचा' शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअर्सचा धुमाकूळ 'या' तीन कारणांमुळे शेअर्समध्ये जबरदस्त वाढ!

मोहित सोमण:आज अदानी समुहांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात अदानी टोटल गॅस (९.२४%), अदानी पॉवर (७.१४%), अदानी एंटरप्राईजेस (३.७३%), अदानी ग्रीन एनर्जी (२.७८%) वाढले आहे. सकाळच्या सत्र सुरू वातीलाच १०% पर्यंत रॅली या शेअर्समध्ये झाली आहे.


अदानी शेअर उसळल्यामागे कारणे पुढीलप्रमाणे -


१) क्लीन चिट - हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने काल अदानी समुह व गौतम अदानी यांना क्लीन चिट दिली आहे. सेबीने तपास पूर्ण करुन आपल्या निष्कर्षावर आधारित अदानी समुहाला निष्कलंक ठरवले असल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठा प्र तिसाद आज दिला. आज सगळ्याच अदानी समुहाच्या उपकंपन्यांतील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सेबीने अदानी समुहाविरूद्ध कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.परिणामी, सेबीने असा निष्कर्ष काढला की अदानी कंपन्यांना किंवा अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्याचे किंवा दंड आकारण्याचे कोणतेही कारण नाही.जानेवारी २०२३ च्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे सुरू झालेल्या महिन्यांच्या छाननी आणि अटकळानंतर अखेर नियामक मंडळ सेबीने क्लीन चिट दिली. ज्यामुळे अदानी समूह कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स घसरले ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. आणि १५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य त्याच्या सर्वात कमी पातळीवर (Lowest Level Valuation) वर पोहोचले.


जानेवारी २०२५ मध्ये आपले कामकाज बंद करणाऱ्या हिंडेनबर्गने जानेवारी २०२३ मध्ये अदानी समूहाविरुद्ध एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की अ‍ॅडिकोर्प एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, माइलस्टोन ट्रेडलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा वापर सार्वजनिकरित्या सूचीबद्ध अदानी पॉवर लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला निधी देण्यासाठी विविध अदानी समूह कंपन्यांकडून निधी वळवण्यासाठी केला जात होता. सेबी च्या प्रकटीकरण नियमांचे (Disclosure Rules) कोणतेही उल्लंघन झाले नाही, कारण अ‍ॅडिकोर्प, माइलस्टोन ट्रेडलिंक्स आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चरमधील समूहाच्या कंपन्यांसोबतचे व्यवहार संबंधित पक्षाच्या व्याख्येनुसार नव्हते, असे सेबी बोर्ड सदस्य कमलेश सी वार्ष्णेय यांनी दोन्ही आपल्या आदेशांमध्ये म्हटले आहे.


२) Morgan Stanley अहवाल- नुकताच Morgan Stanley रिसर्च कंपनीने अदानी समुहावर आपला अहवाल प्रकाशित केला आहे. निरिक्षणानुसार, गुंतवणूक कंपनीच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की अदानी पॉवर हे भारताच्या कॉर्पोरेट इतिहासा ती ल एका चांगल्या बदलाचे उदाहरण आहे ज्यामध्ये बहुतेक नियामक मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे आणि अनेक मूल्यवर्धक अधिग्रहणे (High Value Acquisition) झाली आहेत.प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्लेषकांनी म्हटले की अदानी पॉवर प्रकल्प वेळेवर पूर्ण करून आणि मध्यम कालावधीत अधिक पीपीए जिंकून मजबूत कमाई वाढ देईल अशी अपेक्षा आहे. नवीन कोळसा पीपीएमुळे गुंतवणूकदारांचा कमाईच्या संधीचा विश्वास वाढेल असे Morgan Stanley ने म्हटले.


मॉर्गन स्टॅनलीच्या (Morgan Stanley) संशोधन अहवालानुसार, अदानी पॉवर लिमिटेड (APL) ने भारतातील सर्वात मोठी खाजगी कोळसा-आधारित स्वतंत्र वीज उत्पादक (आयपीपी) म्हणून स्वतःला स्थापित केले आहे ज्याचा पोर्टफोलिओ आठ राज्यांमधील १ २ प्लांटमध्ये पसरलेला आहे.एपीएलने ४३७० मेगावॅट क्षमता असलेली मालमत्ता यशस्वीरित्या मिळवली आहे आणि त्याचे पुनर्वसन सुरू आहे.तसेच आणखी २९०० मेगावॅटचे एकत्रीकरण (Consolidation) सुरू आहे. डिजिटल ऑपरेशन्स आणि इन-हाऊस को ळसा सोर्सिंग आणि लॉजिस्टिक्स तज्ज्ञतेच्या आधारे प्लांटची उपलब्धता सातत्याने ९० टक्क्यांपेक्षा जास्त राखली आहे असे अहवालात नमूद केले गेले आहे.


३) विस्तारीकरण- सप्टेंबर २०२५ च्या सुरुवातीला, उद्योगप ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह आर्थिक वर्ष ३२ पर्यंत वीज क्षेत्रात सुमारे ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणू क करण्याचा निर्धार केला आहे.विशेषतः अक्षय ऊर्जा (Renewable Energy) निर्मिती आणि प्रसारण/वितरण (Production/Distribution) या क्षेत्रात करण्याचा कंपनीचा मानस आहे.गुंतवणूकदारांच्या सादरीकरणात (Investor Presentation अदानी पॉवर म्हणाले की, समूह आर्थिक वर्ष २५ पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता १४.२ गिगावॅटव रून ५० गिगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी आर्थिक वर्ष ३० पर्यंत २१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.अदानी समूहाचा एक भाग, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) युटिलिटी-स्केल ग्रिड-कनेक्टेड सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करते.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक