मुंबईकरांच्या सेवेत लवकरच येणार नविन मोनोरेल

मुंबई : मुंबईतील मोनोरेल, अनेक दिवसांपासून वारंवार बिघाड होत असल्याने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे . मात्र आता मोनोरेल नव्या जोमात प्रवाशांना सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने या सेवेचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यासाठी महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत तांत्रिक सुधारणा, आधुनिक सिग्नलिंग प्रणाली आणि नव्या डब्यांची भर घालण्यात येत आहे. यामुळे मोनोरेलचे नेटवर्क मेट्रोच्या बरोबरीने सक्षम होईल आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह व पर्यायी प्रवास सुविधा मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


या सुधारणांमध्ये सर्वात महत्वाची भर CBTC (Communication-Based Train Control) या प्रगत सिग्नलिंग प्रणालीची असून, ही प्रणाली प्रथमच भारतातील मोनोरेलमध्ये वापरण्यात येत आहे. मुंबई मेट्रोच्या २A आणि ७ या मार्गांवर आधीच वापरात असलेली ही प्रणाली आता मोनोरेलमध्ये देखील कार्यान्वित होत आहे. ही प्रणाली गाड्यांमधील वेळेचे अंतर कमी करेल, सुरक्षितता वाढवेल आणि गाड्या अधिक नियमितपणे धावतील. सध्या, ३२ स्थानकांवर ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग युनिट्स बसवण्यात आले असून, २५० हून अधिक वाय-फाय अ‍ॅक्सेस पॉइंट्स, RFID टॅग्स आणि डिटेक्शन सिस्टीम देखील बसवण्यात आल्या आहेत. वे-साइड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले असून एकात्मिक चाचण्या सुरू आहेत.


तांत्रिक सुधारणांबरोबरच, नवीन आणि आधुनिक डबे (रेक) देखील प्रवासात सामील होत आहेत. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या १० नवीन चार-कोच रेकमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा, CCTV कॅमेरे, आरामदायी सीट्स, एअर सस्पेन्शन, बहुभाषिक प्रवासी माहिती प्रणाली, आणि चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या एकूण २१ सुविधा उपलब्ध आहेत. या रेकचा आतील भाग मेट्रो ट्रेनसारखा आकर्षक आणि प्रवासी अनुकूल ठेवण्यात आलेला आहे. अपंग प्रवाशांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे.


तसेच, जुने मोनोरेल रेक मागे न टाकता त्यांचे आधुनिकीकरण करून नव्या रेकप्रमाणे कार्यक्षम बनवले जात आहे. वारंवार बिघाड आणि सेवेत अडथळ्यांमुळे प्रवाशांचा विश्वास डळमळीत झाल्यानंतर, ही अपग्रेड प्रक्रिया सेवा पूर्ववत करण्यासाठी अत्यावश्यक मानली जात आहे. सध्या चाचण्या सुरू असून, पूर्ण क्षमतेने ही सुधारित मोनोरेल सेवा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे MMRDA च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम