'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळाव्यात या उद्देशाने म्हाडाने आतापर्यंत नागरिक सुविधा केंद्र (सीएफसी), अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली (व्हीएमएस), आणि डीजी-प्रवेश यांसारख्या महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. या शृंखलेत आणखी एक अभिनव पाऊल यकत, आज 'म्हाडासाथी' या एआय चॅटवॉट सेवेचे लोकार्पण 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले.


म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात 'म्हाडासाथी' एआय चॅटवॉटचे प्रात्यक्षिक देताना जयस्वाल म्हणाले की, डीजीटायझेशनच्या युगात म्हाडाने आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करत नागरिकांसाठी उपयुक्ततंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 'म्हाडासाथी' हा चंटबॉट त्या दिशेने घेतलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात हा चॅटबॉट म्हाडाच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला असून, याद्वारे नागरिकांना विविध विषयांवरील अचूक, विश्वासार्ह व तत्काळ माहिती मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, ही सेवा लवकरच मोबाईल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जयस्वाल म्हणाले.


'म्हाडासाथी' हा एनेन्टिक चॅटबॉट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती या चेटबॉटमध्ये नागरिकांना सहज मिळणार आहे. या उपक्रमामुळे म्हाडाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती संगणकीय सोडत प्रणाली विषयीची माहिती, नागरिकांनी म्हाडा कार्यालयामध्ये केलेल्या अर्जाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती, म्हाडातर्फे प्रसिद्ध होणारी निविदा सुचनांबाबतची माहिती, म्हाडाच्या राज्यातील विविध गृहप्रकल्पांची माहिती, म्हाडाचे नवीन नियम, नियमावली यांबाबतची अद्ययावत माहिती नागरिकांना या माध्यमातून मिळणार आहे.


या कार्यक्रमास मुंबई इमारत सुधार व पुनर्विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर (भा.प्र.से.), मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर (भा. प्र.से.), म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पदरकरी, महेशकुमार जेसवाणी, ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्यासह अन्य अधिकारी आणि कमर्चारी वर्ग उपस्थित होते.



नागरिकांना घरातूनच डॉक्यूमेंट पाठवता येणार


म्हाडातर्फे नागरिक सुविधा केंद्राला भेट देणाऱ्या नागरिकाचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात आला असून तो कमी होऊन आता ७ ते ८ मिनिटांवर आणला आहे. नागरिकांचे दस्तवेज अथवा टपाल स्कॅनिगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक आपली कागद‌पत्रे स्कॅन करून यापुढे या केंद्रावर सादर करू शकतील, तसेच पुढच्या टप्प्यात या सुविधा केंद्रावर येऊन कागदपत्रे सादर करण्यापेक्षा नागरिकांना घरी बसूनच कागदपत्रे पाठवता येतील यादृष्टीने ही प्रणाली अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देखील जयस्वाल यांनी दिली. तसेच म्हाडाने आपल्या वेबसाईटवर सुमारे १५ कोटी कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यामुळे म्हाडामध्ये माहिती अधिकारांतर्गत येणारे अर्ज तुलनात्मकरित्या कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.


Comments
Add Comment

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.