गोदरेज फायनान्स लिमिटेडची मुथूट फिनकॉर्पसोबत धोरणात्मक भागीदारी

एमएसएमईसाठी एलएपी क्रेडिट वाढवण्यासाठी मुथूट फिनकॉर्पसोबत भागीदारी


आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २५० कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट


मुथूट फिनकॉर्पच्या भारतातील ३७००+ शाखांद्वारे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये एमएसएमईंना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज फायनान्सची भागीदारी


मुंबई:गोदरेज कॅपिटल ही गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा (Subsidary)शाखा आहे. याच गोदरेज कॅपिटलची उपकंपनी, गोदरेज फायनान्सने (GFL) मुथूट फिनकॉर्पसोबत कर्ज देण्यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे टियर-२आणि टियर-३ शहरांमध्ये एमएसएमईसाठी कर्ज उपलब्धता वाढेल असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या भागात असलेली मुथूट फिनकॉर्पची मजबूत उपस्थिती, मक्तेदारी आणि त्यांचा विस्तार याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला. वित्तीय सेवा मजबूतीने वाढवत देशभरात नेटवर्क तयार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला.या भागीदारीत १० लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेवर कर्ज मिळेल, ज्यासाठी सरासरी तिकीट साईझ (Ticket Size) १५ लाख रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात पसरलेल्या या ऑपरेशन्समुळे कर्जाची मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. लवकरच ही भागीदारी वाढवून सोने कर्ज आणि गृह कर्ज यासारख्या इतर उत्पादनांचा यात समावे श केला जाईल.'


डिजिटल एकत्रीकरणाद्वारे, ही भागीदारी जलद मंजुरी, अधिक पारदर्शकता आणि आरबीआयच्या कर्जसंबंधीच्या नियमांचे पालन करेल असेही कंपनीने यावेळी नमूद केले. कराराच्या अटींनुसार, कंपनी ८०% जोखीम घेईल, तर मुथूट फिनकॉर्प उर्वरित २०% जो खीम उचलेल.यासोबतच मुथूट फिनकॉर्प अंडररायटिंग, कलेक्शन आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करेल, तर कंपनी एकत्रितपणे आखलेल्या धोरणांच्या माध्यमातून अनुपालन सुनिश्चित करेल.


या भागीदारीविषयी प्रतिकिया देताना गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले आहेत की,'वाढत्या व्यवसायासाठी वेळेवर कर्ज मिळाल्याने खूप फरक पडू शकतो. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये जिथे त्याची सर्वाधिक ग रज आहे. मुथूट फिनकॉर्पसोबतच्या आमच्या भागीदारीद्वारे एमएसएमईंसाठी, सोप्या, पारदर्शक आणि जलद कर्ज देण्याच्या पद्धती राबवून ही तफावत भरून काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. व्यवसायांना वाढण्याचे बळ देण्यासोबतच वित्तीय प्रणाली अधिक मजबू त आणि सशक्त तसेच सर्वसमावेशक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'


यावेळी मुथूट फिनकॉर्पचे सीईओ शाजी वर्गीस म्हणाले आहेत की,'शेतीनंतर देशात रोजगार निर्मितीमध्ये एमएसएमईंचे सर्वात मोठे योगदान आहे. मात्र, कर्ज मिळणे हे या क्षेत्रासमोरील एक महत्त्वाचे आव्हान आहे. आमच्या 3700+ शाखा आणि मुथूट फिन कॉर्प वन ऍपसह, आम्ही या एमएसएमईचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दुर्गम भागांपर्यंत आमचा विस्तार केला आहे. गोदरेज कॅपिटलसोबतच्या आमच्या या नवीन भागीदारीमुळे आम्ही एमएसएमईच्या आर्थिक गरजा वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण करून त्यांच्या वा ढीस आणखी हातभार लावू, याची मला खात्री आहे.'उपकंपनी जीएफएल (GFL) द्वारे, कंपनी एमएसएमई (MSME) आणि वैयक्तिक कर्जदारांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे कर्ज पर्याय उपलब्ध करून देते. यामध्ये मालमत्तेवरील कर्ज, लहान तिकिटांसाठी मालमत्तेवर उद्योग कर्ज आणि असुरक्षित व्यवसाय कर्जे अशा ऑफर उपलब्ध आहेत.


कंपनीच्या रचनात्मक माहितीनुसार या आर्थिक वर्षात, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भारतातील उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत या भागीदारीचे लक्ष्य २५० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे आहे. एनबीएफसींमधील काही कर्ज भागीदारांपैकी एक म्ह णून, ते एक मजबूत डिजिटल-प्रथम दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. तसेच वेगाने वाढणाऱ्या एमएसएमई कर्ज क्षेत्रात व्यापक सहभागासाठी पाया तयार करते.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे