मोहित सोमण:आजपासून जीके एनर्जी लिमिटेड (GK Energy Limited) कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड १४५ ते १५३ रूपये प्रति शेअर निश्चित केला आहे. आज १९ ते २३ सप्टेंबर कालावधीत आयपीओ गुंत वणूकदारांसाठी उपलब्ध असेल तर माहितीप्रमाणे, पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Share Allotment) २४ सप्टेंबरला होणार आहे. तसेच कंपनी २६ सप्टेंबरला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४६४.२६ बूक व्हॅ ल्यु (Valuation) असलेला हा आयपीओ २.६१ कोटी शेअरसह बाजारात येईल. हा फ्रेश इशू असून उर्वरित ऑफर फॉर सेल (OFS) करता किमान ९८ शेअर किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदी करावे लागतील म्हणजेच एकूण १४९९४ रुपयांची किमान गुंतवणूक गुंतवणूकदारांना करावी लागेल.
IIFL Capital Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. बीएसई व एनएसई या दोन्ही बाजारात कं पनी सूचीबद्ध होईल. एकूण २१२४०६५५ शेअर बाजारात उपलब्ध असतील. त्यापैकी ६०६८७५९ शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ६०६८७५९ शेअर एक्स अँकर, ४५५१५६९ शेअर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १०६२०३२७ शेअर किरकोळ गुं तवणूकदारांसाठी उपलब्ध असतील. .
गोपाल राजाराम काब्रा व मेहूल अजित शहा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९३.२९% होते ते घसरून आयपीओनंतर ७८.६४% होईल. २००८ साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी प्रामुख्याने इंजिनिअरिं ग, प्रोकरमेंट, ईपीसी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट उद्योगात आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल ३१०३.१० कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी (Long Term Working Capital Requirements), दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीला दुपारी १२.३४ वाजेपर्यंत ०.९४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी १.४२ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, ०.०१ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, व १.०५ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूक दारांकडून मिळाले आहे.
जीएमपी किंमत -
सध्या कंपनीच्या शेअरची जीएमपी (Grey Market Price) दुपारी १२.५२ वाजेपर्यंत २५ रुपये प्रिमियम दराने सुरु आहे. म्हणजेच मूळ प्राईज बँड असलेल्या किंमतीपेक्षा २५ रूपये अधिक दराने सुरू असल्याने बिडिंगसाठी प्रति शेअर किंमत १७८ रुपये पातळी वर पोहोचली आहे.
कंपनी शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंप सिस्टीमचे सर्वेक्षण, डिझाइन, पुरवठा, असेंब्ली आणि स्थापना, चाचणी, कमिशनिंग आणि देखभाल यासाठी एंड-टू-एंड सिंगल-सोर्स सोल्यूशन देते.जीके एनर्जी सध्या अँसेट-लाइट बिझनेस मॉडेल चालवते. कंपनी वे गवेगळ्या विशेष विक्रेत्यांकडून 'जीके एनर्जी' ब्रँड अंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंप सिस्टीमचे सौर पॅनेल, पंप आणि इतर विविध घटक मिळवते.