शेतक-यांच्या मागणीमुळे आता 'या' योजनेच्या निकषात करणार बदल

ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन


मुंबई : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  महावितरणच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.तसेच मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


यावेळी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या.यावेळी उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा,निता केळकर,संचालक (वित्त) अनुदिप दिघे यासह इतर अधिकारी उपस्थित  होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात शेतक-यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे.ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेवून मार्गदर्शक सूचना काढाव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण,महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत.


महापारेषण कंपनीने सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे . यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी  महापारेषण कडून होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Comments
Add Comment

लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३