प्रतिनिधी:आयफोन १७ स्मार्टफोन सिरीजच्या विक्रीला सुरूवात झाल्याने ग्राहकांनी बीकेसी येथे गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात अँपलचे चाहते आउटलेटमध्ये गर्दी करत आहेत. ८२९०० ते २२९९०० रुपयांच्या घरात असलेल्या या आयफोन विक्रीत मोठी वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात आँनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. सर्वाधिक लक्झरी फोनमधील मागणी आयफोनला असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. आयफोन १७ नंतर आयफोनला १६ ला ग्राहकांनी पसंती दिली होती. आजपासून ज्यांनी प्री बुकिंग केले होते त्यांना या फोनचा आजपासून उपभोग घेता येईल.एक नावीन्यपूर्ण बाब म्हणजे नव्याने लाँच झालेल्या आयफोन १७ साठी लागणाऱ्या कामाच्या तासांच्या संख्येत भारत जगात अव्वल आहे, सरासरी भारतीय कामगाराला देशाच्या सरासरी वेतनानुसार ९६७ तास का म करावे लागते. हे स्टॅटिस्टाने (Statista) केलेल्या एका अभ्यासानुसार स्पष्ट झाले होते. ज्यामध्ये भारताला जागतिक यादीत अव्वल स्थान देण्यात आले आहे, त्यानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो, जिथे आयफोन १७ मिळविण्यासाठी सरासरी कामगाराला ५९८ तास कष्ट करावे लागतात.
नवीन लाँच केलेले डिव्हाइस खरेदी करणाऱ्यांमध्ये पहिले असण्याची आशा बाळगून अनेक खरेदीदार मध्यरात्रीपासून रांगेत उभे होते. अनेक ग्राहक देशाच्या विविध भागातून प्रवास करत होते, ज्यामुळे अॅपलच्या नवीनतम आयफोन्सची देशभरातील मागणी दि सून येते.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या 'अवे ड्रॉपिंग' कार्यक्रमात अँपलने सादर केलेल्या आयफोन १७ लाइनअपमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात अपग्रेडेड ऑडिओ आणि हेल्थ-ट्रॅ किंग वैशिष्ट्यांसह अँपल वॉच सिरीज ११, वॉच अल्ट्रा ३, वॉच एसई ३ आणि एअरपॉड्स प्रो ३ लाँच करण्यात आले होते. माहितीनुसार आयफोन १७ ला इन्स्टंट कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि दीर्घकालीन ईएमआय पर्यायांसह ऑफर देण्यात आल्या आहेत आय फोन १७ ची विक्री सुरू, मुंबई, दिल्लीच्या स्टोअरमध्ये प्रचंड गर्दी, लाँच ऑफर्स, सवलती देण्यात येत आहेत.