दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग सध्या या निवडणुकांसाठी नियोजन करण्यात गुंतला आहे. काही दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊ आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असे सूत्रांकडून समजते.

दिवाळीनंतर लगेच म्हणजे ऑक्टोबर - नोव्हेंबर पासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. तीन टप्प्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे पुढील सलग काही आठवडे आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लांबणार असल्यामुळे त्याचा थेट फटका विकासकामांना बसण्याचा धोका आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रात ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. शेवटच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयाप्रत निवडणूक आयोग आला आहे. याबाबतचा अधिकृत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला देण्यात येणार असून, यात प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल.
Comments
Add Comment

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश