Stock Market: अमेरिकेकडून झालेल्या दरकपातीमुळे भारतीय शेअर बाजाराची कवाडे उघडली. शेअर बाजारात तेजी IT Stocks जोरात

मोहित सोमण: सकाळच्या सत्रातच गिफ्ट निफ्टीत वाढ झाली होती. तोच ट्रेंड आज कायम राहणार असून सकाळच्या ओपनिंग बेलनंतर शेअर बाजारात वाढ झाली आहे. युएस बाजारातील फेड रल रिझर्व्ह व्याजदरातील किरकोळ कपातीचा फायदा मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात अपेक्षित आहे. यालाच कौल देऊन इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. स त्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ३९७.८० अंकांने व निफ्टी ९१.१५ अंकांने वाढला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १८४.१८ व बँक निफ्टीत २४६.१० अंकाने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉ लकॅपमध्ये अनुक्रमे ०.२४%,०.१७% वाढ झाली आहे व निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२९%,०.२३% वाढ झाली आहे. काल प्रमाणेच आजही मिड स्मॉल कॅपमधील चलती बाजाराती ल वाढ सुनिश्चित करत आहे.


सेन्सेक्समध्ये ब्लू चिप्स कंपनीपैकी इन्फोसिस, एचसीएल टेक, टेकमहिंद्रा, सन फार्मा आणि एचडीएफसी बँक हे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले, तर आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली असून बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फायनान्स, आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे शेअर्स सुरुवातीच्या कलात घसरले आहेत.


सकाळी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ आयटी (१.५४%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.३८%), फार्मा (०.३६%), मिडिया (०.५२%) निर्देशांकात झा ली असून घसरण मात्र मेटल (०.२४%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.०२%) निर्देशांकात झाली आहे. विशेषतः आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा २.३४% घसरल्याने बाजारात सापेक्ष तेजी दिसून येते. विशेषतः आज फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात व भारत युएस यांच्यातील यशस्वी चर्चा या दोन गोष्टीचा 'ट्रिगर' बाजारात असल्याने गुंतवणूकदारांची या निमित्ता ने चांगली कमाई अपेक्षित आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या शेअरसह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये होणारी हालचाल विशेष ठरणार आहे तत्पूर्वी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institution al Investors FII) यांचाही कौल बाजारात निर्णायक ठरू शकतो.


आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात सर्वाधिक पुनावाला फायनान्स (७.७३%), सोनाटा सॉफ्टवेअर (४.१६%), झेन टेक्नॉलॉजी (४.१४%), एलटीआय माईंड ट्री (३.३३%), एल अँड टी टे क्नॉलॉजी (३.२२%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.१७%), इंडियन रिन्यूऐबल एनर्जी (२.५७%), मस्टेक (२.१४%), विप्रो (१.९४%), केपीआयटी टेक्नॉलॉजी (१.१४%), इन्फोसिस (१.९५%), आदित्य बिर्ला कॅपिटल (१.८०%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.३१%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण कोहान्स लाईफ (५.३४%), डीसीएम श्रीराम (४.३२%), पीटीसी इंडस्ट्रीज (१.७९%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (१.३९%), रिलायन्स पॉवर (१ .३९%), सारडा एनर्जी (१.३६%), हिंदुस्थान कॉपर (१.१५%), डेटा पँटर्न (१.१५%), वर्धमान टेक्सटाईल (१.११%), टाटा केमिकल्स (१.०१%), हिताची एनर्जी (०.७९%), बजाज फायनान्स (०.९६%) टाटा स्टील (०.७६%), बजाज होल्डिंग्स (०.७५%) समभागात झाली आहे.


आजच्या सत्रपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राईम रिसर्च देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'अर्थव्यवस्थेतील बदलत्या जोखीम गतिमानतेचा हवाला देत फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचा चक्र पुन्हा सुरू केला आणि दर २५ बेसिस पॉइंट्सनी कमी करून ४.०-४.२५ टक्क्यांच्या लक्ष्य श्रेणीपर्यंत आणले. फेड अधिकाऱ्यांनी या वर्षी दोन अतिरिक्त दर कपातीचा अंदाज वर्तवला, २०२५ च्या अखेरीस दर ३.५०-३.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला.केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे कामगार बाजारातील मंदीबद्दल वाढत्या चिं ता दिसून आल्या, ज्यामध्ये अल्पसंख्याक कामगारांमध्ये वाढती बेरोजगारी आणि घटत्या कामाच्या आठवड्याचा समावेश आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी रोजगार बाजाराला "जिज्ञासू प्रका रचे संतुलन" अनुभवत असल्याचे वर्णन केले जिथे कामगारांसाठी पुरवठा आणि मागणी दोन्ही मंदावले आहेत, संभाव्य घसरणीच्या जोखमींचा इशारा, ज्यामध्ये जास्त टाळेबंदीचा समावेश आहे.


सुरुवातीला व्यापक अपेक्षित कपातीवर बाजारांनी गर्दी केली परंतु गुंतवणूकदारांनी फेडच्या रोजगार-केंद्रित संदेशांवर प्रक्रिया केल्याने बाजार मिश्रित बंद झाला. डाऊ जोन्स ०.५ टक्क्यांनी वाढ ला, तर एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक अनुक्रमे ०.१ टक्के आणि ०.३ टक्क्यांनी घसरले, घसरत्या व्यापारादरम्यान विक्रमी उच्चांकावरून मागे हटले.चीनने प्रमुख कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांक डून एआय चिप्स खरेदी थांबवण्याचे निर्देश दिल्याच्या वृत्तानंतर तंत्रज्ञान समभागांनी कमी कामगिरी केली. एनव्हीडिया २ टक्क्यांहून अधिक आणि ब्रॉडकॉम ३ टक्क्यांहून अधिक घसरले, ज्यामुळे अमेरिका-चीन तंत्रज्ञान तणाव आणि पुरवठा साखळीतील भेद्यतेबद्दल चिंता वाढली.दर कपात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणात्मक पसंतींशी सुसंगत आहे परंतु त्यांनी वकिली केलेल्या आक्रमक सव लतींपेक्षा ती कमी आहे. नवीन फेड गव्हर्नर स्टीफन मिरन यांनी एकमेव असहमती दर्शविली, स्पष्टपणे त्यांच्या आर्थिक अंदाजांवर आधारित सखोल कपातींना अनुकूलता दर्शविली.


कमी दर सामान्यतः स्वस्त वित्तपुरवठा खर्चाद्वारे जोखीम मालमत्तेला आधार देतात, परंतु कामगार बाजारातील कमकुवतपणा कायम राहिल्यास सकारात्मक परिणाम मर्यादित होऊ शकतो. फेड च्या आर्थिक अंदाजांच्या सारांशात अधिकाऱ्यांच्या दर कपातीच्या अपेक्षांमध्ये मोठी तफावत दिसून आली, जी आर्थिक दृष्टिकोनाबद्दल अनिश्चितता दर्शवते.कॉमोडिटीजमध्ये, फेड सवलती सुरू रा हिल्याच्या अपेक्षा असूनही सोने $३७०० प्रति ट्रॉय औंसच्या जवळच्या विक्रमी उच्चांकावरून थोडे मागे पडले. अमेरिकेतील इन्व्हेंटरीमध्ये लक्षणीय घट असूनही पुरवठ्याच्या चिंतेमुळे कच्चे तेल $ ६४ प्रति बॅरलच्या वर स्थिर राहिले.काल निफ्टीने ९१ अंकांची म्हणजेच ०.३६% वाढ नोंदवत २५३३० वर बंद झाला. गेल्या १३ पैकी ११ सत्रांमध्ये निफ्टीने वाढ नोंदवली आहे आणि २९ ऑगस्ट २०२ ५ रोजीच्या २४४०४ पातळीच्या नीचांकी पातळीपेक्षा ९०० पेक्षा जास्त अंकांनी वाढ नोंदवली आहे.निफ्टी हा वाढीचा ट्रेंड सुरू ठेवत आहे आणि २५१५० च्या जवळ आधार आहे, जो दैनिक चार्टवर मागील स्विंग उच्च आहे. वरच्या बाजूला, २५५५० आणि २५६७० हे महत्त्वाचे प्रतिकार आहेत ज्यांकडे लक्ष ठेवावे लागेल.सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारवर उघड ण्यास सज्ज आहेत.'


काल उशीरा झालेल्या युएस बाजारातील दरकपातीवर भाष्य करताना Indiabonds.com चे सह संस्थापक विशाल गोयंका म्हणाले आहेत की,अमेरिकन फेडने बेंचमार्क व्याजदर अपेक्षेप्रमाणे २ ५ बेसिस पॉइंट्सने कमी केले, नोकऱ्यांमध्ये घट होण्याची चिंता होती, परंतु ट्रम्प टॅरिफनंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे कोणतेही चलनवाढीचे परिणाम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत हे देखील अधोरेखित केले. ५० बेसिस पॉइंट्स कपातीसाठी एक मतभेद होता. समिती सदस्यांनी दिलेल्या फॉरवर्ड डॉट प्लॉट्सनुसार, फेड आता या वर्षी पुन्हा दोनदा ५० बेसिस पॉइंट्सने कपात करण्याची अपेक्षा आहे.क्रेडीट ऑफ टेकमध्ये मंदी आणि अर्थव्यवस्थेत वाढ होण्यास चालना मिळाल्याने आरबीआयला दर कपात करण्याचा मार्ग स्पष्ट होतो. दुसरे कारण म्हणजे बँकिंग प्रणालीमध्ये आताप र्यंत दर कपातीचे मंद प्रसारण. हे सरकारी बाँड उत्पन्नाच्या तीव्र वक्रतेमुळे आहे कारण बँका अल्पावधीत कर्ज घेतात आणि वाढीच्या क्षेत्रांसाठी दीर्घ कालावधीसाठी कर्ज देतात. व्याजदरात कपात करून आणि सरकारी सिक्युरिटीजचे अल्पावधीत जारी करण्यामध्ये संतुलन साधून कंपन्यांसाठी आणि सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेसाठी कर्ज घेण्याचा खर्च कमी करण्याचा इच्छित परिणाम मि ळू शकतो. या आर्थिक वर्षात आणखी दर कपात होण्याची अपेक्षा असलेल्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे.'


त्यामुळे यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे फेड दरकपातीची घडामोड शेअर बाजारात मोठे वळण देईल. विशेषतः किरकोळ कपातीमुळे भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास परदेशी संस्थात्मक गुंतव णूकदार प्रवृत्त होऊ शकतात. जीएसटी कपातीचा फायदा ग्राहक उपयोगी वस्तू़वर होत असल्याने बाजारातील मजबूती सातत्याने अधोरेखित होत आहे. सकाळच्या सत्रातही त्याची पुनरावृत्ती झा ली.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

आनंदाची बातमी, लाखो लोकांना पक्की घरं मिळणार !

प्रतिनिधी: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत

अभिमानास्पद! GII १३९ देशांमध्ये भारत ३९ व्या क्रमांकावर पोहोचला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी:प्रसिद्ध जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशनह इंडेक्स २०२५ (Global Innovation Index GII)मध्ये भारत १३९