लिंबू पाणी प्या..
सकाळी उठल्यावर लिंबाचे पाणी प्यायलात तर रक्तातील क्षार वाढतील. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल तसेच पचनक्रिया सुधारेल.
सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आहार..
सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्याचा पांढरा भाग, फळे, नारळपाणी याचा समावेश करू शकता.
दुपारचे जेवण म्हणजे शाकाहारी थाळी..
ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीसोबत पालेभाज्या, कडधान्य, ताक, काकडी, गाजर, बीटाची कोशिंबीर याचा समावेश असेल तर आरोग्य उत्तम रहाते.
संध्याकाळचा नाश्ता तेलकट नसावा..
संध्याकाळ झाली कि चहा सोबत चटपटीत खायला मिळावं असं सर्वांना वाटतं. पण त्याऐवजी चणे, शेंगदाणे, कुरमुरे असं खाऊन भूक आणि तब्येत दोन्ही सांभाळू शकता.
रात्रीचे जेवण हलके घ्या..
रात्रीच्या जेवणात सूप, सलाड, हिरव्या भाज्या, डाळ-भात असा साधा आहार केला तर पचायला सोपे जाते.