संपादित ज्ञान स्फूर्ती ज्ञान प्रतिभा ज्ञान

संपादित ज्ञान स्फूर्ती ज्ञान प्रतिभा ज्ञान


सद्गुरु वामन पै-

मनुष्यप्राणी हा व्यवहारातून ज्ञान मिळवतो. ऐकण्यातून, वाचण्यातून ज्ञान मिळवतो. बोलण्यातून ज्ञान मिळवतो. हे जे ज्ञान आहे ते आपण कुठल्यातरी माध्यमातून मिळवत असतो. हे झाले संपादित ज्ञान म्हणजेच Knowledge by Acquisition. पुढचा ज्ञानाचा प्रकार आहे Knowledge by Inspiration. कविता करणारे जे लोक आहेत. पाडगांवकरांसारखे किंवा मोठेमोठे कवी होऊन गेले त्यांनी ह्या स्फूर्तीरुपी प्रेरणा ज्ञानाने कविता केल्या. ते ज्या जशा कविता करतात तशा कोणाला सहजासहजी जमणार नाहीत. त्यांना ते स्फूर्ती ज्ञान आहे. मोठेमोठे शोध लागतात त्यांच्या ठिकाणी हेच प्रेरणा ज्ञान असते. आवश्यक ती तरतूद, तयारी, विशिष्ट दिशेने प्रयत्न हे असतातच, पण स्फूर्ती ज्ञान हे असतेच. कुठल्यातरी शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, ९९.९९ टक्के Preparation असते व ०.०१ टक्के Inspiration असते. ही त्यांची नम्रता झाली. ध्यान लावून बसणारे लोक असतात, म्हणून त्यांना सर्वांना साक्षात्कार होतोच असे नाही. नुसते घाम गाळणारे कितीतरी असतात पण त्यांच्याकडून भव्यदिव्य काही होतेच असे नाही. घाम गाळलाच पाहिजे हे असतेच, पण प्रेरणाज्ञान असेल तर तुम्हाला भव्यदिव्य अनुभवाला येईलच. हे अभ्यासातून येणे वेगळे व उपजत असणे वेगळे. लता मंगेशकरांचे गाणे, आशा भोसले ह्यांचे गाणे किंवा सुमन कल्याणपूर ह्यांचे गाणे, ही मंडळी जी गातात ते सगळे गाऊ शकत नाही. त्यांना ती देणगीच मिळालेली आहे. ही जी देणगी आहे ती निसर्गाकडून मिळाली म्हणा, परमेश्वराकडून म्हणा, दिव्य शक्तीकडून म्हणा किंवा वारसा हक्काने मिळाली म्हणा, हे जे आहे त्यात तयारी, मेहनत, सज्जता आहेच, पण स्फूर्ती ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानाचा आणखी एक प्रकार आहे व हा वरील दोघांच्याही पलीकडे असतो. लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज उपजत ज्ञानी होते. उपजत ज्ञान म्हटले की, काही लोकांचा गैरसमज होतो. ज्ञानेश्वर महाराज उपजत ज्ञानी होते ते वेगळे व इतरांचे उपजत ज्ञान वेगळे हे लक्षांत घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञान काय होते हे सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांकडे जे ज्ञान होते ते फक्त प्रेरणेच्याही पलीकडचे होते. ते आहे प्रतिभा ज्ञान "Knowledge by Intuition ". प्रतिभा ही सुद्धा देवाचीच देणगी आहे व ती प्रेरणेच्या वरची आहे. परमेश्वराचे उदाहरण घेतले तर परमेश्वराकडून एवढी सगळी सृष्टी घडली, तेव्हा तो कुठे कुणाकडे शिकायला गेला होता. ह्या दिव्य चैतन्यशक्तीकडे पहिले तर ह्या दिव्य शक्तीच्या ठिकाणी दिव्य प्रतिभा आहे, म्हणून परमेश्वराची व्याख्या केली ती म्हणजे दिव्य शक्ती, अधिक दिव्य जाणीव, अधिक दिव्य ज्ञान म्हणजे परमेश्वर. ह्या दिव्य शक्तीच्या ठिकाणी हे सर्व आहे ह्याचा आपण अनुभवही घेतो. हीच प्रतिभा ज्ञानाची देणगी आहे.

Comments
Add Comment

मृगजळाच्या लाटांत दीपस्तंभाची स्थिरता

ऋतुराज : ऋतुजा केळकर आज का कोणजाणे, पण माझं मन अतिशय अस्थिर होतं आणि अचानक शब्द उमटले, कल्पनाः मृगतृष्णेव, नित्यं

देव आहे का?

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य देव आहे का?” हा प्रश्न मानवजातीसमोर हजारो वर्षांपासून उभा आहे. अनेकांनी त्यावर

ज्ञानोपासना हीच काळाची गरज

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै काही विज्ञाननिष्ठ लोक असे म्हणतात की, ते परमेश्वर मानत नाहीत. विज्ञान हाच देव आहे

Kapil Mahamuni

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी पुरुष वेगळा प्रकृतीहून। हे कपिलांचे तत्त्वदर्शन।। भगवान कपिलांचा ‘पुरुष’ हा

माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे आपल्या सनातन परंपरेत असे अनेक लोक आहेत ज्यांना आपण अध्यात्माचे आधारस्तंभ मानतो, मग

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे