IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ०.२४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारां कडून एकूण ०.४१ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून ० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ०.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ५६०.२९ कोटी बूक व्हॅल्यु असलेला हा आयपीओ आजपासून सुरू झाला असून २२ सप्टेंबरपर्यंत बिडिंग (बोलीसाठी) खुला असणार आहे. २५ सप्टेंबरला कंपनी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. IIFL Capital Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. Kfin Technolog ies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४९५० रूपयांची गुंतवणूक (५० शेअर) करणे अनिवार्य असणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २३ सप्टेंबरला करण्यात येईल. यापैकी १.८७ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) करता उपलब्ध असतील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी च कंपनीने काल अँकर गुंतवणूकदारांकडून १६८.०९ कोटींची उभारणी केली होती.


सुनिल कुमार पिल्लई, क्रिष्णा राज पिल्लई, श्रीनिवासन श्रीराम हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ३९.९२% होते जे आयपीओनंतर घसरत ३१.७३% पर्यंत खाली येईल. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर यापूर्वी १९% महसूल मिळाला असून करोत्तर नफा (Profit after tax PAT) २१% मिळाला आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) सध्या १६००.८४ कोटी रुपये होते. कंपनी प्रामुख्याने एंटरप्राईजे सोलूशन कंपनी आहे.

Comments
Add Comment

Lumax Q2RESULTS: Lumax Industries कंपनीचा निकाल जाहीर! कंपनीच्या करोत्तर नफ्यात १६% वाढ तर मार्जिनमध्येही सुधारणा

मोहित सोमण:लुमॅक्स इंडस्ट्रीज (Lumax Industries) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

Firecraker Attack On Elephant : क्रूरतेचा कळस! सिंधुदुर्गमध्ये नदीत आंघोळ करणाऱ्या 'ओंकार हत्ती'वर सुतळी बाॅम्बने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

सिंधुदुर्ग : एका अत्यंत संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात

शॉर्ट सेलिंग व एसएलबीएम नियमात होणार बदल? सेबीकडून 'हे' मोठे संकेत मंथली एक्सपायरीवरही पांडे यांचे भाष्य

प्रतिनिधी:बाजार नियामक सेबी (Security Exchange Board of India SEBI) लवकरच शॉर्ट सेलिंग (Short Selling) संबंधित नवे कडक नियम बनवू शकते. तसे संकेत

ITR Aadhar- Pan Card Link: तुमचे आधार पॅन कार्ड जोडलय का? नसेल जोडल्यास लवकर जोडा नाहीतर होणारे गंभीर आर्थिक परिणाम

मोहित सोमण:आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? नसेल तर आताच जोडा कारण आता ३१ डिसेंबर २०२५ शेवटची तारीख आधार -