Gold Silver Rate: US Fed व्याजदर कपातीचा सोन्या चांदीवर परिणाम सोन्यात सलग दुसऱ्यांदा घसरण चांदीतही घसरण कायम

मोहित सोमण:युएस फेड निकालापूर्वी सोन्यात अनेक स्थित्यंतरे आली. मोठ्या प्रमाणात सोन्यात हालचाली झाल्या. काही दिवसांच्या मोठ्या कमोडिटी रॅलीनंतर अखेर आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात घसरण झाली आहे. प्रामुख्याने युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरा त २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्याने अमेरिकेतील बाँड मार्केट काहीसे स्थिरावले आहे.अशातच आज डॉलरच्या निर्देशांकात (DXY US Dollar Index) मध्ये वाढ झाल्याने आज कमोडिटीत दबाव निर्माण झाला पर्यायाने आज फेड व्याजकपातीचा परिणाम म्ह णून बाजारातील सोन्याची दरपातळी व मागणी घसरली आहे. घटलेल्या स्पॉट बेटिंगनंतर संध्याकाळपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली.


'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५४ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४० रूपये घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११११७ रूपयांवर, २२ कॅ रेटसाठी १०१९० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ८३३८ रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५४० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १११७० रूपये, २२ कॅरेटसाठी १०१९०० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४३८० रूपयांवर पोहोचली.आज जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४५% घसरण झाली आहे. प्रति डॉलर तुलनेत जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्ड स्पॉट दरात ०.२२% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ३६६८.३६ प्रति औंसवर गेली. डिसेंबर डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स १.३% ने घसरून $३,६७०.४५ वर आला.


फेडने २५ बेसिस पॉइंट्सने दर कमी केले, भविष्यातील सवलतींबद्दल सावधगिरी बाळगले. बुधवारी फेडने आपला बेंचमार्क दर २५ बेसिस पूर्णांकाने कमी करून ४.००% ते ४.२५% पर्यंत कमी केला. सलग सहा वेळा दर स्थिर ठेवण्यानंतर डिसेंबरनंतरची ही पहि लीच कपात आहे. धोरणकर्त्यांनी या वर्षी दोन अतिरिक्त कपातीचा अंदाज लावला होता, परंतु आर्थिक वर्ष २०२६ मध्ये फक्त एकच झाली ज्यामुळे फेडरल रिझर्व्हची सावध भूमिका अधोरेखित झाली.यावर बोलताना युएस फेड चेअरमन जेरोम पॉवेल म्हणाले आ हेत की, 'कामगार बाजारातील परिस्थिती मऊ होत चालली आहे आणि रोजगार जोखीम वाढली आहे, त्यामुळे ही कपात "जोखीम-व्यवस्थापन कपात" (Risk Management) आहे.' या कारणामुळे सोन्यात मागणी आज घसरली. मुंबईसह भारतातील प्रमुख शह रातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १११४९ रूपये, २२ कॅरेटसाठी १०२२० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४७० रूपयांवर सुरु आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये संध्याकाळपर्यंत सोन्याचा निर्देशांक ०.१८% घसरण १०९६२८ दर पातळीवर पोहोचला आहे.


चांदीच्या दरातही घसरण !


आज चांदीच्या दरातही फेड व्याजदरात कपात प्रभावी ठरल्याने चांदी स्वस्त झाली. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने घसरण होत किंमत १३२ रूपयांवर पोहोचली. तर प्रति किलो दर १००० रुपयांनी घसरत १३ १००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% वाढ झाली असून भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२०% वाढ झाल्याने दरपातळी १२७२३५ रूपयावर गेली आ हे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १३१० रूपये, प्रति किलो दर १३१००० रूपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातही आज मागणी घसरल्याने घट झाली. विशेषतः ईपीएफ गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली गेल्याने चांदी च्या मागणीत गेल्या महिन्यात वाढ झाली होती. मात्र व्याजदरातील कपातीमुळे चांदीवरील दबाव कमी झाला आहे.

Comments
Add Comment

चिनी संस्थेचा जीपीएस ट्रॅकर लावलेला सीगल कर्नाटकच्या किनाऱ्यावर सापडला

तो सीगल मंगळवारी कारवार येथील रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर किनारी सागरी पोलीस विभागाला सापडला आणि त्याला

ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल

ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल

सीबीएफसी ओटीटी कंटेंटवर सेन्सॉरशिप करू शकत नाही

स्ट्रीमर्सना आचारसंहितेअंतर्गत ३-स्तरीय नियमांचे पालन करावे लागेल - माहिती तंत्रज्ञान नियमांचे

Navnath Ban : 'संजय राऊत स्वतःला पक्षप्रमुख समजू लागलेत का?' भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघाती हल्ला

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार : नवनाथ बन मुंबई : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या

Pradnya Satav : अखेर प्रज्ञा सातव यांनी हाती घेतलं कमळ! चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये पक्षप्रवेश

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ.

Pradnya Satav : काँग्रेसला 'दणका'! प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे सोपवले पत्र

"राजीव सातव अमर रहे"च्या घोषणा अन् आजच 'कमळ' हाती घेणार? मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी