आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर आली आहे. पडताळणीदरम्यान एका ग्रामपंचायतीमध्ये एकाच घराच्या नंबरवर ६३२ मतदार नोंदणीकृत आढळले आहेत. तर, दुसऱ्या ग्रामपंचायतीत एका घराच्या नंबरवर ४,००० पेक्षा जास्त मतदार आढळले आहेत.


हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, अधिकारी याला लिपिकाकडून झालेली चूक सांगून चूक दुरुस्त करण्याची ग्वाही देत आहेत. जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत १,०६,५४२ बनावट मतदार आढळले आहेत.


बीएलओ घरोघरी जाऊन बनावट मतदारांची तपासणी करत असताना तपासणीदरम्यान महोबा जिल्ह्यात एआयने केलेल्या तपासात १,०६,५४२ बनावट मतदार आढळले आहेत. वृंदावन यांच्या ८०३ क्रमांकाच्या घरामध्ये मतदार यादी क्रमांक २२८३ ते ६९६९ पर्यंत तब्बल ४,२७१ मतदार नोंदवले गेले आहेत. ही यादी पाहून पडताळणीचे काम करणाऱ्या बीएलओ रश्मी यांचे डोके चक्रावून गेले. त्यांनी तात्काळ एसडीएम कुलपहाड यांना या प्रकरणाची माहिती दिली.



निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह


आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. महोबा जिल्ह्यात एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार नोंदणीकृत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यापूर्वी संजय सिंह यांनी महोबातील दोन घरांमध्ये २४३ आणि १८५ मतदार सापडल्याचा दावा केला होता. आता एकाच घरात ४,२७१ मतदार सापडल्यामुळे हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "एका घरात ४,२७१ मतदार असल्यास, त्या कुटुंबात सुमारे १२,००० सदस्य असावेत. इतके मोठे कुटुंब शोधून काढणे गरजेचे आहे," असे उपरोधिकपणे सिंह म्हणाले.

संजय सिंह यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने उत्तर प्रदेशात 'मतदारचोरी' सुरू झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी महोबातील त्या घराच्या मालकाला उपरोधिकपणे सांगितले की, "जर तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली, तर तुम्ही सहज जिंकू शकता, कारण तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मतांनीच तुमचा विजय निश्चित होईल."
Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ