मोहित सोमण: ब्रोकरेज कंपन्यांनी विविध क्षेत्रांमधून (Sectoral Stock) कंपन्यांच्या स्टॉक खरेदी करण्याच्या शिफारसी (Recommendation) केल्या आहेत. मास्टरट्रस्ट ब्रोकिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सिस डायरे क्ट, व्हेंचुरा सिक्युरिटीज, देवेन चोक्सी, एमके ग्लोबल, आनंद राठी येथील विश्लेषकांनी दीर्घकालीन परतावा मिळवून देऊ शकणारे शकणारे ७ लार्जकॅप आणि ३ मिडकॅप स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे रेमंड लाइफस्टाइल, टाटा कम्युनिकेशन्स, आ धार हाऊसिंग, एटरनल, हॅवेल्स, करूर वैश्य बँक, जेके लक्ष्मी सिमेंट, वारी रिन्यूएबल एनर्जी,इन्फोसिस आणि आदित्य बिर्ला कॅपिटल, गोदरेज प्रॉपर्टीज, पानासीईका बायोटेक आहेत.
आज कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर ठरणार ही आहे यादी - (Stock Recommendations Today)
१) Panacea Biotech- या कंपनीच्या शेअर्सला ४३८ किंवा त्याहून अधिक किंमतीवर आनंद राठीचे मेहूल कोठारी यांनी 'Buy Call' दिला आहे. लक्ष्य किंमत (Target Price) ४७६ रूपये प्रति शेअर एसएल (Stop Loss) - ४२० रूपये प्रति शेअर. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, हा शेअर सध्या कंसोलिडेशन (एकत्रीकरण) फेजमध्ये आहे. ४३८ रूपयांच्या वर ब्रेकआऊट असून २०० डीएमए (Daily Moving Average DMA) टेक्निकल पातळीवर शेअर कामगिरी करू शकतो. याच ब्रेकआऊट पातळीने ४७६ रू पयांची पातळी शेअर पार करू शकतो असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
२) Godrej Properties - २०५० ते २०२० रूपयांच्या पातळीवर शेअर खरेदी करण्याचा सल्ला आनंद राठी वेल्थचे मेहूल कोठारी यांनी दिला आहे. लक्ष्य किंमत (Target Price) २२५० रूपये असून एसएल (Stop Loss) १९५० रूपये लावण्याचा सल्ला ब्रो करेजने दिला आहे. ब्रोकरेजच्या मते, या शेअरमध्ये करेक्शन झाल्याने ३४०० रूपयांचा शेअर १९०० रुपयांवर आला होता. आता त्याने मागील रॅलीच्या ६१.८% मागे (Retracted) घेतले आहे आणि तो आता फॉर्ममध्ये आहे. . किंमत २०० आठवड्यांच्या ईएमए (E xponential Moving Average EMA) आणि एस एम ए (Simple Moving Average SMA)च्या आसपास फिरत आहे, असे संकेत मिळत आहे. किंमत २०० आठवड्यांच्या EMA आणि SMA च्या आसपास फिरत आहे, जे मजबूत बेस दर्शविते.पुढील ३-६ म हिन्यांत २२५० पर्यंत नवीन तेजी येण्याची शक्यता आहे असे ब्रोकरेजने म्हटले आहे.
खरेदीसाठी इतर काही महत्वाचे शेअर -
Tata Communications- आयसीआयसीआय सिक्युरिटीजने २००० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Raymond Lifestyle Limited - मास्टर ट्रस्ट ब्रोकिंग रिसर्चने कंपनीच्या शेअरला १५२५ रूपये लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Aadhar Housing Finance - कंपनीच्या शेअरला आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकिंग रिसर्चने ६२५ रूपये लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Havells - आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकिंग रिसर्चने शेअरला १८०० रूपये लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Eternal (Zomato) Limited - एमके ग्लोबल ब्रोकरेजने ३३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Karur Vysya Bank - आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकिंग रिसर्चने कंपनीच्या शेअरला २६७ रूपये लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
JK Lakshmi Cement - ॲक्सिस डायरेक्ट सिक्युरिटीजने कंपनीच्या शेअरला १०५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Waree Energy Limited - कंपनीच्या शेअरला वेंचुरा सिक्युरिटीजने १४१६ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Infosys - कंपनीच्या शेअरला विश्लेषक देवेन चौकसी यांनी १८३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
Aditya Birla Capital - एमके (Emkay) ग्लोबल रिसर्च ब्रोकिंगने आदित्य बिर्ला कॅपिटल शेअरला ३२० रूपये लक्ष्य किंमतीसह 'Buy Call' दिला आहे.
(टीप- ही मते प्रकाशनाची नसून विश्लेषकांची आहेत. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. झालेल्या नुकसानीस प्रकाशन अथवा ब्रोकरेज कंपन्या जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुंतवणूकदार करताना सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून तज्ञां च्या सल्ल्यानेच पुढे निर्णय घ्यावा. संबंधित माहिती केवळ अभ्यासाचा भाग म्हणून प्रसिद्ध केली आहे.)