आताची सर्वात मोठी बातमी - 'देशाची' कार मारुतीने आपल्या कारवर केली मोठी दरकपात खरेदी करताय? मग ही किंमत जाणून घ्या

प्रतिनिधी: भारतातील जनसामान्यांच्या मनात घर केलेल्या व सर्वात लोकप्रिय असलेल्या मारूती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांच्या किंमतीत कपात केली आहे. २२ सप्टेंबरपासून या किंमती लागू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसामान्यांना लाभ पोहोच वल्याच्या स्वप्नपूर्ती खातर अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५६ व्या जीएसटी काऊन्सिल बैठकीत कपातीचा निर्णय घेतला गेला. त्याचा फायदा ग्राहकांसाठी पोहोचवण्यासाठी मारूती सुझुकीने हे पाऊल उचलले आहे. जीएसटी तर्कसंगतीकरण (GST Ratio nalisation) चा भाग म्हणून मारूतीच्या Swift, Dzire, Brezza, Ertiga या कारच्या किंमती घसरणार आहेत.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाकडून स्विफ्ट, डिझायर, बलेनो, फ्रॉन्क्स आ णि ब्रेझा सारख्या मॉडेल्सच्या किमती १.१० लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. नवीन किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील, ज्या दिवशी सुधारित जीएसटी दर लागू होतील. मारुती आपल्या कार अरेना डीलरशिप आणि नेक्सा डीलरशिपद्वारे विकते.अरेना (Are na) कारमध्ये अल्टो के१०, एस-प्रेसो, वॅगनआर, सेलेरियो, इको, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा आणि एर्टिगा यांचा समावेश आहे. नेक्सा मॉडेल्समध्ये इग्निस, बलेनो, फ्रॉन्क्स, जिमनी, ग्रँड विटारा, एक्सएल६ आणि इन्व्हिक्टो यांचा समावेश आहे. मारुतीचे देशभरात ४००० हून अधिक अरेना शोरूम आणि ७०० हून अधिक नेक्सा शोरूम आहेत.


जीएसटी २.० पद्धतीमध्ये, अल्टो के१० वर ५२९१० रुपये, एस-प्रेसो वर ५२१४३ रुपये, वॅगनआर वर ६३९११ रुपये, सेलेरियो वर ६२८४५ रुपये, इको वर ६७९२९ रुपये, स्विफ्ट वर ८०९६६ रुपये, डिझायर वर ८६८९२ रुपये, ब्रेझावर ४८२०७ रुपये आणि एर्टिगावर ४६२२४ रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे असे वृत्तसंस्थेला सुत्रांनी सांगितले.नेक्सा कारच्या किमतीत, इग्निसवर ६९२४० रुपये, बलेनोवर ८०६६७ रुपये, फ्रॉन्क्सवर ११०३८४ रुपये, जिमनीवर ५१०५२ रुपये, ग्रँड विटारावर ६७७२४ रुपये, एक्सएल६ वर ५११५५ रुपये आणि इन्व्हिक्टोवर ६१३०१ रुपये इतकी घट होईल. जीएसटी दर सुसूत्रीकरणासह, इंटर्नल ज्वलन इंजिन (Internal Combustion Engine ICE) आणि हायब्रिड कारच्या किंमती १८% आणि ४०% स्लॅबमध्ये असतील. हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारख्या लहान कारवर १८% जीएसटी लागू होईल, तर तुलनेने मोठ्या मॉडेल्स आणि लक्झरी वाहनांवर ४०% कर आकारला जाईल. त्यावर कोणताही भरपाई उपकर लागणार नाही.


GST १.० पद्धतीमध्ये, ICE आणि हायब्रिड कारवर २८% GST होता, तसेच वाहनाची लांबी, इंजिन क्षमता आणि बॉडी स्टाईलनुसार १% ते २२% पर्यंत भरपाई उपकर आकारला जात होता. लहान मॉडेल्सना कमी उपकर भरावा लागत होता, परंतु मोठ्या कारना सर्वाधिक भरावा लागत होता. यामुळे एकूण २९% ते ५०% कर (२८% GST + १% ते २२% भरपाई उपकर Compensation Cess) भरावा लागत होता.यापूर्वी टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, किआ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई मोटर इंडि या जेए सडब्लू एमजी मोटर इंडिया, होंडा कार्स इंडिया, रेनॉल्ट इंडिया, स्कोडा ऑटो इंडिया आणि फोक्सवॅगन इंडिया यासारख्या प्रतिस्पर्धी कार उत्पादकांनीही किमतीत कपात करून जीएसटी कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत. लक्झरी कार उत्पादकां मध्ये, मर्सिडीज-बेंझ इंडिया, BMW ग्रुप इंडिया, जग्वार लँड रोव्हर (JLR) इंडिया, ऑडी इंडिया आणि व्होल्वो कार इंडियानेही त्याचे अनुकरण नुकतेच केले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी यंदाची दिवाळी जोरदार असणार आहे यात शंका नाही.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा