ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि प्रत्येक कामगिरीसह नवा इतिहास रचण्याच्या जवळ जात आहे. चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने ९१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांसह ११७ धावा केल्या. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीमधील हे १२ वे शतक ठरले आहे. या शताकासह ती दोन देशांविरुद्ध तीन शतके झळकावणारी पहिली भारतीय फलंदाज ठरली आहे.

या शतकासह स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत जगातील संयुक्त तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज बनली आहे. स्मृती आणि इंग्लंडची टॅमसिन ब्यूमोंट आता प्रत्येकी १२ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता तो दिवस दूर नाही जेव्हा ती लवकरच न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा १३ शतकांच्या विक्रमाला मागे टाकण्यात यशस्वी होईल.

स्मृतीचे ध्येय सुझी बेट्सचा विक्रम नाही तर ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंगचा विक्रम मोडित काढण्याचे असणार आहे. जी अव्वल स्थानावर आहे. लॅनिंग तिच्या ३४ व्या वर्षी १०३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ शतकांसह महिला एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक शतके करणारी फलंदाज आहे. लॅनिंगशी बरोबरी करण्यासाठी स्मृतीला फक्त तीन शतकांची आवश्यकता आहे. आणि तिची फलंदाजीची क्षमता पाहता तो दिवस दूर नाही जेव्हा ती लॅनिंगलाही मागे टाकेल.

चंदीगडमधील या शतकासह स्मृती मानधना वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध किमान तीन शतके झळकावणारी पहिली फलंदाज बनली. तिच्या आधी मिताली राज (श्रीलंकेविरुद्ध ३ शतके) आणि सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर (इंग्लंडविरुद्ध ३ शतके) यांनी एकाच देशाविरुद्ध हा पराक्रम केला आहे. पण मानधनाने आता दोनदा हा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके केल्यानंतर आता स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा हा पराक्रम केला आहे

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना