व्हॉट्सॲपकडून भारतात दुसऱ्या बिझनेस समिटचे आयोजन; व्यक्ती व व्यवसायांना कनेक्ट होण्यासोबत व्यवसाय करण्यासाठी मदत करणाऱ्या वैशिष्ट्यांचे प्रदर्शन
नवीन टूल्स व्यवसायांना कटिबद्धता, ग्राहक पाठिंबा आणि शोधक्षमतेला चालना देण्यास मदत करतील
मुंबई: सर्व आकाराच्या व्यवसायांना त्यांची उपस्थिती दर्शवण्यास, सर्वोत्तम व आनंददायी ग्राहक अनुभव निर्माण करण्यास आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सक्षम करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत व्हॉट्सॲप ने मुंबईत आयोजित केलेल्या दुस ऱ्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये अनेक टूल्स आणि सुधारित वैशिष्ट्ये दाखवली. हे व्यवसाय समिट ग्राहकांमध्ये दृढ संबंधाला चालना देण्यासाठी, कायर्ससंचालने सुव्यवस्थित करण्यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस चा फायदा घेत असलेल्या सर्व आकाराच्या व्यवसायां करिता कार्यक्षमतेला गती देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
WhatsApp Business App's Payment
व्हॉट्सॲपने आता लहान व्यवसायांसाठी क्षमता सादर केल्या आहेत, जेथे त्यांना व्हॉट्सॲप बिझनेस ॲपमध्ये प्रत्यक्ष सुरक्षित व सोईस्कर पेमेंट पर्याय दिला आहे.ॲपवर हा पर्याय उपलब्ध असल्याने लहान व्यवसाय आता जलद व कार्यक्षम विक्री व्यवहारांसाठी एका टॅपमध्ये त्वरित क्यूआर कोड शेअर करू शकतात, ज्यामुळे ग्राहक ॲपवर त्यांच्या निवडीने पेमेंट पद्धतीचा वापर करत प्रत्यक्ष पेमेंट करू शकतात असे यावेळी कंपनीने म्हटले.
अधिक ग्राहक पाठिंब्यासाठी ॲपलमध्ये कॉलिंग + बिझनेस एआय (Calling Business AI)
आता व्हॉट्सॲपने नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे ज्यामुळे वापरकर्ते प्रत्यक्ष ॲपमधून एका टॅपमध्ये मोठ्या व्यवसायांशी संपर्क साधू शकतात किंवा त्यांनी विनंती केलेल्या व्यवसायांचे कॉल्स स्वीकारू शकतात. ही कॉलिंग क्षमता विशेषत: व्यक्ती चौकशी करत असताना आणि ग्राहक समर्थन कार्यकारीची संवाद साधण्याची गरज असताना लाभदायी आहे. हे वैशिष्ट्य भारतात व्हॉट्सअँप बिझनेस प्लॅटफॉर्मवर सर्व व्यवसायांसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच, व्हॉट्सॲप अतिरिक्त पाठिंब्यासाठी वॉईस मेसेजेस् पाठवण् याची व स्वीकारण्याची किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा सुरू करणार आहे, जे टेलिहेल्थ अपॉइण्टमेंट सारख्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकते असेही कंपनीने समिटमध्ये नमूद केले व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मवर हे अपडेट्स आल्याने व्यक्तींना त्यां च्यासाठी सर्वोत्तम असलेल्या पद्धतीने संवाद साधण्यास मदत होईल. व्यवसाय अधिक ग्राहक पाठिंबा वाढवण्यासाठी देखील बिझनेस एआयची अंमलबजावणी करत आहेत, जेथे ग्राहक वॉईस कॉलिंग वैशिष्ट्याचा वापर करत एआय असिस्टण्टशी बोलताना त्यांच् या शंकांचे निराकरण करू शकतात.
अँडस मॅनेजरमध्ये केंद्रीकृत मोहिमा (Centralised Campaigns in Ads Manager)
कंपनीने म्हटले आहे की,'भारतातील व्यवसाय आता व्हॉट्सॲप फेसबुक व इन्स्टाग्रामवर त्यांचे विपणन(Marketing) धोरण तयार करू शकतात आणि व्यवस्थापन करू शकतात, जे सर्व अँड्स मॅनेजरमध्ये आहे. यामुळे व्यवसायांना एका केंद्रीकृत ठिकाणी स मान क्रिएटिव्ह, सेटअप फ्लो व बजेट वापरता येतील. ऑनबोर्ड झाल्यानंतर व्यवसाय त्यांची सबस्क्रायबर यादी अपलोड करू शकतात आणि अतिरिक्त प्लेसमेंट म्हणून मॅन्युअली मार्केटिंग मेसेज निवडू शकतात किंवा अँडवाण्टेज+ (Advantage+) वापरू शक तात, त्यानंतर मेटाच्या एआय सिस्टम कामगिरी वाढवण्यासाठी प्लेसमेंटमध्ये बजेट ऑप्टिमाइझ करतील.
व्यक्तींना स्टेटस टॅबवर अधिक व्यवसाय व चॅनेल्स शोधण्यास मदत
व्हॉट्सॲप अपडेट्स टॅब दररोज जगभरात १.५ बिलियन व्यक्ती वापरतात आणि व्हॉट्सॲप अँडस इन स्टेटस, प्रमोटेड चॅनेल्स आणि चॅनेल्स सबस्क्रिप्शन्सच्या माध्यमातून येथे व्यवसाय व क्रिएटर्ससाठी विकसित होण्याचे मार्ग निर्माण करत आहे मारूती सुझुकी एअर इंडिया व फ्लिपकार्ट यांसारखे ब्रँड्स अँडस इन स्टेटस वैशिष्ट्याचा वापर करत आहेत आणि भारतातील अपडेट्सचा वापर करणाऱ्या व्यक्तींना लवकर हे वैशिष्ट्य पाहायला मिळेल. जिओ हॉटस्टार सारख्या लोकप्रिय चॅनेल्सनी देखील प्रमोटेड चॅनेल्सचा वापर करायला सुरूवात केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ही वैशिष्ट्ये हळूहळू सुरू होतील आणि तुमच्या व्हॉट्सअँप चॅट्स व इनबॉक्सपासून दूर असतील असे कंपनीने यावेळी म्हटले.
व्हॉट्सॲपने दाखवले की मारूती सुझुकी ब्रँड व त्यांच्या उत्पादनांच्या शोधाला चालना देण्यासाठी अँडस इन स्टेटसचा वापर करत आहे. याविषयी बोलताना एमएसआयएलच्या मार्केटिंगचे कार्यकारी संचालक भुवन धीर म्हणाले आहत की,'आम्ही व्यव साय विकासाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप वापर करत आहोत. अँडस ऑन व्हॉट्सॲप स्टेटस आम्हाला आमची उत्पादने व सेवांचा शोध आणि विक्रीला चालना देण्यास अधिक मदत करेल.'व्हॉट्सॲपचे नवीन अँड्स इन स्टेटस वैशिष्ट्य एअर इंडियाच्या डिजिटल-केंद्रित परिवर्तन दृष्टिकोनाशी संलग्न आहे, जेथे जाहिरात फक्त दिसण्याबाबत नाही तर रिअल-टाइम संबंधांना चालना देण्याबाबत आणि सर्वोत्तम, तंत्रज्ञान-केंद्रित टचपॉइण्ट्सच्या माध्यमातून ग्राहकांचा प्रवास उत्साहित करण्याबाबत आहे.या वैशिष्ट्यामध्ये त्वरित ग्राहक सहभाग, बुकिंग्ज व पाठिंब्यासाठी विनासायास पाथवे तयार करण्याची क्षमता आहे. यामुळे आम्हाला प्रत्यक्ष ग्राहकांच्या दैनंदिन परस्परसंवादांमध्ये सर्वोत्तम प्रवास अनुभव देता येईल असे एअर इंडिया लिमिटेडचे मुख्य विपणन अधि कारी सुनिल सुरेश म्हणाले आहेत.
एकाच वेळी लहान व्यवसायांसाठी व्हॉट्सॲप बिझनेस अँप आणि व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मचा वापर -
लहान व्यवसाय आता एकाच वेळी व्हॉट्सअँप बिझनेस अँप आणि व्हॉट्सअँप बिझनेस प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात, ज्यासाठी त्यांना त्यांचा फोन नंबर बदलण्याची गरज नाही. व्यवसायांना विपणन मोहिमांमधून (जसे सीटीडब्ल्यूए) व्हॉट्सअँपवर ग्राहकांच्या मेसेजमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असेल किंवा त्यांची व्हॉट्सअँप बिझनेस प्लॅटफॉर्मवर (API) ऑटोमेशन वापरण्याची इच्छा असेल तर ते ग्रुप चॅट्स, कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स अशा दैनंदिन परस्परसंवादांसाठी व्हॉट्सअँप बिझनेस अँपचा वापर करू शकता त. यामुळे झपाट्याने विकसित होत असलेल्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात स्थिरता आणि अधिक विकास करण्याची संधी मिळेल असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.