ही मुदतवाढ 15 सप्टेंबर रोजी अनेक करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी आणि प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागल्यामुळे देण्यात आली आहे. यामुळे लाखो लोकांना शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्यात अडचणी येत होत्या. अनेक चार्टर्ड अकाउंटंट आणि करदात्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दिली आहे.
या निर्णयामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आपले रिटर्न भरले नाहीत, त्यांना आता विलंब शुल्क आणि दंडापासून वाचण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला आहे. करदात्यांनी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.