मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून प्रवाशांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मेट्रो प्राधिकरणातर्फे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून पहिल्या गाड्या, आरे जेव्हीएलआर आणि आचार्य अत्रे चौक येथून सकाळी ५.५५ वाजता सुटतील. यापूर्वी या मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुटत होत्या. यासह शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल.


मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्गिकेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो-३ ची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना सकाळी ६.३० ऐवजी ५.५५ वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर ७ सप्टेंबरपासून मात्र नियमित वेळेनुसार म्हणजेच सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेतच मेट्रो सेवा सुरू होती. या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम

मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री, अधिकारीच गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी व्यक्त मंत्रालयात शुकशुकाट बैठकीला जेमतेम

‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो, स्विगी’ झुकले!

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येस ‘झोमॅटो-स्विगी’ या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडून २ हजार ७०३ आस्थापनांची तपासणी, १३६ विरोधात कारवाई*

मुंबई : नववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,