Redington चा शेअर अचानक २०% उसळला कारण ऐकून थक्क व्हाल !

मोहित सोमण:दिवसाअखेर रेडिंग्टन लिमिटेड (Redington Limited) कंपनीचा शेअर १९.८३% म्हणजेच जवळपास २०% उसळत २८९.३० रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे. दुपारपर्यंतच कंपनीचा शेअर १६% पेक्षा उसळत व्यवहार करत होता. दिवसभ रात इंट्राडे ट्रेडिंगवर १६ ते २०% प्रिमियम दराने शेअर व्यवहार करत असल्याने या समभागात (Stocks) मोठी मागणी निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेअर्समध्ये वाढ झाली. सत्राच्या सुरुवातीलाच सकाळी बाजारातील माहितीनुसार, कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली आहे. सकाळीच ७ कोटी शेअरची उलाढाल झाली होती. यापूर्वी २० दिवसांच्या सरासरीनुसार केवळ ८.७ कोटीं शेअर्सची उलाढाल झाली होती.


बाजारातील उपलब्ध माहितीनुसार या कंपनीच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील झाले आहे. अद्याप खरेदी व विक्री करण्याऱ्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत. मात्र टेक्निकल बेसिस वर कंपनीचा शेअर या वाढीसह ५० दिवसांच्या डीएमए (Daily Moving Average DMA) हून अधिक वाढला. यापूर्वी कंपनीच्या निकालानुसार, इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या महसूलात २२% वाढ झाली होती तर ईबीटा ( करपूर्व कमाई EBITDA) ८% वाढली होती. मात्र कंपनीच्या मार्जिनमध्ये गेल्या वर्षी घसरण झाली होती.


प्रामुख्याने आ यफोन १७ लाँचच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी या शेअरला मोठा प्रतिसाद दिला. १९ सप्टेंबरला भारतात Apple iPhone 17 ची विक्री सुरू होणार आहे. प्री-ऑर्डर आधीच सुरू झालेल्या आहेत. रेडिंग्टन हे भारतातील Apple उत्पादनांचे प्रमुख वि तरक (Distributor) आहे. कंपनीने २००७ मध्ये भारतात Apple उत्पादनांचे वितरण सुरू केले.

Comments
Add Comment

टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड' कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे