BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या ५७ वर्षीय नवजोत सिंग यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार नवज्योत सिंग आणि त्यांची पत्नी संदीप कौर यांच्या दुचाकीला,  भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने मागून जोरदार धडक दिली, ही धडक इतकी जबरदस्त होती की यामुळे नवज्योत सिंग यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली.  या प्रकरणात, पोलिसांनी सोमवारी आरोपी महिला गगनप्रीत कौरला अटक केली आहे. अपघातानंतर गगनप्रीतवर सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नवज्योत सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी, त्यांची जखमी पत्नी संदीप कौर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अपघातानंतर नवज्योत यांचा श्वास चालू होता, त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्याच्या विनवण्या त्यांनी केल्या. मात्र त्यांच्या विनंतीला न जुमानता, बीएमडब्ल्यू कारमधील जोडप्याने त्यांना १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेले.


नवज्योत बांगला साहिब गुरुद्वाराहून  पत्नी संदीप कौरसोबत परतत असताना हा अपघात घडला. बांगला साहिब गुरुद्वाराहून परतल्यानंतर, दोघांनीही कर्नाटक भवनात जेवण केले आणि नंतर घरी परत जात होते. या दरम्यान, गगनप्रीत कौरची बीएमडब्ल्यू कार त्यांच्या दुचाकीच्या मागील बाजूस आदळली. या अपघातात नवज्योत  सिंगचा मृत्यू झाला, तर संदीप कौर गंभीर जखमी झाली. यादरम्यान जखमी संदीप कौर यांनी विनंती करूनही, त्यांना जाणूनबुजून दूरच्या रुग्णालयात नेण्यात आले.



नवज्योत सिंगच्या पत्नीचे गंभीर आरोप


संदीप कौर यांनी पोलिसांना सांगितले की, अपघातानंतर त्यांनी गगनप्रीतला वारंवार जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी विनंती केली.  परंतु गगनप्रीतने व्हॅन चालकाला तिला न्युलाइफ हॉस्पिटल जीटीबी नगर येथे नेण्यास सांगितले. हे रुग्णालय सुमारे १९ किलोमीटर अंतरावर होते. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी गगनप्रीतचे वडील या रुग्णालयाचे सहमालक आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा काही प्रयत्न करण्यात आला का? याचाही पोलिस तपास करत आहेत.



पुरावे लपवल्याचा संशय


वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांशी छेडछाड करता यावी, म्हणून गगनप्रीतने नवज्योत आणि संदीप यांना न्यूलाइफ हॉस्पिटलमध्ये आणले अशी शंका पोलिसांची आहे. रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, सर्व नियमांचे पालन करण्यात आले परंतु त्यांनी गगनप्रीतच्या कुटुंबाचा रुग्णालयाशी संबंध असल्याची पुष्टी केलेली नाही.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय