आताची मोठी बातमी: भारत व अमेरिका संबंध सु़धारणार? पुन्हा कटुता दुरावून पडद्यामागे हालचाली

प्रतिनिधी: आताची मोठी बातमी पुढे आली आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुनः पुन्हा सुधारले जाऊ शकतात असा संकेत दस्तूरखुद्द सरकारने दिला आहे. असे झाल्यास भारतीय निर्या तदार व व्यापारी वर्गाला या निमित्ताने दिलासा मिळेल. यावर स्पष्टीकरण देताना भारत-अमेरिका व्यापार चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्र सारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांची (Negotiator) एक टीम सोमवारी उशिरा नवी दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेसोबत व्यापार चर्चा राजनैतिक, व्यापार, मुख्य वाटाघाटीकार आणि मंत्रीस्तरीय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहेत. अनेक व्यापार मुद्द्यांवर चर्चा होत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय मंत्र्यांबद्दल या बैठकीतून अधिक स्पष्टता येईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जि यो गोर यांनी सिनेटला सांगितले.गेल्या महिन्यात ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध बिघडले होते व यानंतर काही काळ थांबल्यानंतर व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेचे गोर (Gor) यांनी गेल्या आठवड्यात नमूद केले की व्यापार कराराच्या बाबतीत अमेरिका आणि भारत फार करारापासून खूप दूर नाहीत आणि ते फक्त कराराच्या बारकाव्यांवर वाटाघाटी करत आहेत.


मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल मैत्रीची अनुकुलता दर्शविली असताना तसेच या नव्या वाटाघाटी देवाणघेवाण केल्यानंतर काही दिवसांतच भारत-अमेरिका संबंधांमध्ये काहीशी कटुता संपली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना 'चांगले मित्र' (Good Friend) आणि नवी दिल्लीला एक मौल्यवान भागीदार म्हणून वर्णन केले, तर मोदींनीही या हावभावाचे कौतुक केले आणि म्हटले की भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि भविष्यवादी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असतानाही, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर १००% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नक्की यावर काय काय पुढे घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

अखेर तो ऐतिहासिक क्षण आलाच... मंदिर शिखरावर धर्म ध्वज फडकला अन् हिंदुचे स्वप्न साकार!

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला

T20 World Cup 2026 Full Schedule : ४ गट, २० संघ! २०२६ च्या ICC T-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण ग्रुप रचना आणि सामन्यांची ठिकाणे; तुमचा आवडता संघ कुठे खेळणार?

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे

रामजन्मभूमीमध्ये मोदींचे आगमन, ध्वजारोहणाची लगबग सुरू

अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज

Ram Mandir Flag Hoisting Ceremony : १९१ फूट उंची आणि २२ फूट लांबीचा विक्रमी ध्वज, आज अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या