वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व झोपलेले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सेवाश्रम शाळा कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सालागुडा येथे आहे. येथे शुक्रवारी रात्री विद्यार्थी वसतिगृहात झोपले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले. डोळे चिकटवल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी डोळे उघडताच आले नाहीत. त्यानंतर त्यांना आधी गोछापाडा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर चांगल्या उपचारांसाठी फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. एक विद्यार्थ्याची तब्बेत बरी असून इतर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फेविक्विकमुळे डोळ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक का टाकण्यात आले हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक