
छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या झाल्याची घटना उघडकीस येत आहे.
नाथापूर येथील गोरख देवडकर यांनी ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबली पाहिजे यासाठी त्यांनी स्वत:च आयुष्य संपवून घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करते आहे, मात्र आता मुलीचं काय होईल याच भीतीपोटी नैराश्यातून गोरख नारायण देवडकरयांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
यापूर्वी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील ३५ वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली आहे. भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. कराड यांनी यापूर्वीही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता, हे प्रकरण ताजे असताना, आता बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसरी आत्महत्या झाली आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.