पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के
शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे टार्गेट
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत चालला असून सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ९८.४० टक्के अर्थात १४ लाख २४ हजार १६४ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या १७ दिवसांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाल्यास मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवणे शक्य होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधील पाणीसाठा हा १४ लाख २४ हजार १६४ अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो. त्या तुलनेत आता या सर्व धरणांमध्ये ९८.४० टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.