अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आणि त्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर माहिती घेऊया. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय प्रल्हाद कुमार हा चालक मुलुंड-ऐरोली रोडवरून त्याच्या मिक्सर ट्रकमधून जात असताना, त्याच्या गाडीची (एमएच-१२ आरटी-५०००) कारशी टक्कर झाली. यादरम्यान कारमधील दोन अज्ञात व्यक्तींसोबत चालक प्रल्हाद याचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की, त्याला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवून त्याचे अपहरण करण्यात आले. 


सदर घटनेबाबत चालकाने केलेल्या पोलिस तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासादरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) खरात यांना चालक प्रल्हाद ज्या कारमध्ये प्रवास करत होता ती पुण्यातील असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कार चतुर्श्रृंगी परिसरातील पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी आढळली. पुढे, पोलिस पथकाने तेथे जाऊन अपहरण केलेल्या चालक प्रल्हादची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली. मात्र या कारवाईत तिथे हजर असलेल्या पूजा खेडकरच्या आईने पोलिसांसोबत वाद करून, कारवाईत बाधा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी पोलिस पथकाशी गैरवर्तन देखील केले.



मनोरमा खेडकर यांचे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांसोबत गैरवर्तन


पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिस पथकाशी गैरवर्तन केले आणि निवासस्थानाचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा देखील आणला. त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांना रबाळे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिक्सर (ट्रक) चालकाशी झालेल्या भांडणानंतर, कारमधील लोकांनी सांगितले की त्यांना पोलीस ठाण्यात नेले जात आहे. पण खेडकर कुटुंबातील सदस्यांनी त्याला थेट पुण्यात नेले आणि एका खोलीत बंद करून ठेवले.

मनोरमा खेडकरवर यापूर्वीही गुन्हा दाखल


पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर यापूर्वी देखील एक गुन्हा दखल करण्यात आला होता. एक वर्षापूर्वी मनोरमा खेडकर यांच्यावर जमिनीच्या वादातून बंदूक दाखवून काही व्यक्तींना धमकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत चालक प्रल्हादचे अपहरण करणाऱ्या दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. पण खरी मेख म्हणजे, अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली लँड क्रूझर कार पूजा खेडकर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. शिवाय घटनास्थळी  मनोरमा खेडकर यांची उपस्थिती आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याच्या त्यांनी केलेला प्रयत्न, या गोष्टींची देखील पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल चतुर्श्रृंगी पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये