भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक लठ्ठ आणि जादा वजन असलेल्या मुलांचा देश ठरू शकतो, असा इशारा युनिसेफ इंडियाचे आहार विभागाचे प्रमुख मारी-क्लॉद डेसिले यांनी दिला. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.


अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण सध्या खाद्यपदार्थांच्या पॅकच्या पुढील भागावरील लेबल (एफओएनएल) तयार करत आहे. या लेबलमुळे साखर, मीठ व चरबी जास्त असलेले पदार्थ ग्राहकांना सहज ओळखता येतील. सर्वोच्च न्यायालयाने आधीच हे नियम अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत.


‘युनिसेफ’च्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतात सुमारे २७ दशलक्ष (२.७ कोटी) मुले आणि किशोरवयीन लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतील. हे जागतिक एकूण संख्येच्या ११ टक्के इतके आहे. डेसिले यांनी सांगितले की, भारताकडे नेतृत्व करण्याची संधी आहे. वेळेत उपाययोजना झाल्या, तर भारत इतर देशांसाठी आदर्श ठरू शकतो. भारतामध्ये आधीच फिट इंडिया मूव्हमेंट, ईट राईट इंडिया, पोषण अभियान २.० यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, ‘युनिसेफ’च्या मते अजून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भारतासमोर एकीकडे कुपोषण, तर दुसरीकडे लठ्ठपणा अशा त्रिगुणी पोषण-संकटाची स्थिती आहे. योग्य निर्णय आताच घेतले, तर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकते.





  • भारतात २०३० पर्यंत २७ दशलक्ष लठ्ठ मुले असण्याचा अंदाज




  • ‘एफएसएसएआय’कडून लवकरच फ्रंट-ऑफ-पॅक लेबलिंग




  • जाहिरातींवर निर्बंध आणि हेल्थ टॅक्सची गरज




  • पोषण अभियानासारख्या योजना सुरू; पण आणखी पावले आवश्यक




आवश्यक उपाययोजना




  • आरोग्यकर अन्न उत्पादनाला प्रोत्साहन




  • अस्वास्थ्यकर अन्नावरील जाहिरातींवर नियंत्रण




  • ‘हेल्थ टॅक्स’ लावण्याचा विचार




  • शालेय पातळीवर पोषण-जागरूकता कार्यक्रम



Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच