अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तीर्थक्षेत्र मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलली


जम्मू आणि काश्मीरमध्ये हवामान स्वच्छ झाल्यानंतर, लवकरच माता वैष्णोदेवीची यात्रा पुन्हा सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा एकदा बातमी येत आहे की सततच्या मुसळधार पावसामुळे १४ सप्टेंबरपासून सुरू होणारी यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. माता वैष्णोदेवीच्या यात्रेला भवन आणि यात्रा मार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना बोर्डाने लिहिले की, "जय माता दी. भवन आणि यात्रा मार्गावर सततच्या पावसामुळे, १४ सप्टेंबर (रविवार) पासून सुरू होणारी माता वैष्णोदेवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भाविकांना पुढील अधिकृत आदेशाची वाट पाहण्याची विनंती आहे."

यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार होती


१२ सप्टेंबर रोजी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने त्यांच्या अधिकृत 'X' हँडलद्वारे १४ सप्टेंबरपासून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होत असल्याची माहिती दिली होती. श्राइन बोर्डने लिहिले होते की, "जय माता दी. हवामान अनुकूल राहिल्यास वैष्णो देवी यात्रा १४ सप्टेंबर (रविवार) पासून पुन्हा सुरू होईल. तपशील-बुकिंगसाठी, कृपया "Maa Vaishno Devi.org" ला भेट द्या.

खराब हवामानामुळे २६ ऑगस्टपासून यात्रा बंद


खरं तर २६ ऑगस्टपासून ही यात्रा बंद करण्यात आली आहे. कारण त्या दिवशी जम्मूत अत्यंत खराब हवामानादरम्यान माता वैष्णो देवी मंदिर मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे ३५ हून अधिक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता आणि १० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामुळे, माता वैष्णो देवी यात्रा पुढे ढकलण्यात आली. गेल्या काही दिवसांत कटरा येथे झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनाने हॉटेल्स आणि धर्मशाळा रिकामी करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर हवामान यात्रेसाठी अनुकूल झाल्यानंतर ही यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करत असल्याची आनंद वार्ता बोर्डाने भाविकांना दिली होती. मात्र पुन्हा हवामान खराब झाल्यामुळे श्राइन बोर्डाने वैष्णोदेवी यात्रा काळी काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Comments
Add Comment

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट